महाराष्ट्र
अंत्रोळीत तरुणाईचा स्वच्छतेचा एल्गार! ‘एक रविवार गावासाठी’ उपक्रमाचा उत्साहात शुभारंभ... चौमुखी हनुमान मंदिर परिसरात युवकांनी राबविली स्वच्छता मोहीम; गावाच्या स्वच्छतेसाठी तरुणाईचा पुढाकार
समीर शेख प्रतिनिधी
अंत्रोळी : दि. १ नोव्हेंबर रोजी गावातील सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता राखण्याबरोबरच नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने अंत्रोळी येथे ‘एक रविवार गावासाठी’ या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. उपक्रमाच्या पहिल्या दिवशी श्री चौमुखी हनुमान मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेत गावातील तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत मंदिर परिसराची स्वच्छता केली. सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवणे ही केवळ ग्रामपंचायतीची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
या उपक्रमाची संकल्पना युवा नेतृत्व बिरू शिंदे आणि ग्रामपंचायत अधिकारी गणेश फडतरे यांची असून, माजी सरपंच जितेंद्र थोरात व भाऊराव बेलदार यांचे मार्गदर्शन लाभले.
या उपक्रमासाठी बिरा थोरात, माजी उपसरपंच मजनोद्दीन पठाण, नागेश कोळी, संजू कोळी, श्रेयश बेलदार यांच्यासह ग्रामस्थांनी सहकार्य केले. यावेळी तरुणांसह ज्येष्ठ नागरिकही उपस्थित होते.
‘स्वच्छ गाव, सुंदर गाव’ हा संकल्प प्रत्यक्ष कृतीतून राबविण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
Previous article
This Is The Newest Post
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा