डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील 200 विद्यार्थ्यांची शपथविधी - दैनिक शिवस्वराज्य

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील 200 विद्यार्थ्यांची शपथविधी

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
 डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी शवविच्छेदनापूर्वीची शपथ घेतली. यावेळी 200 विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमात, विभागप्रमुख डॉ. अमृत महाजन आणि डॉ. शुभांगी घुले यांनी विद्यार्थ्यांना वैद्यकीय अभ्यासाच्या महत्वाच्या आचारसंहितेबद्दल मार्गदर्शन केले. शपथविधी डॉ. पूनम यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाला.
विशेष म्हणजे, डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय प्रत्येक 10 विद्यार्थ्यांसाठी एक शव अभ्यासासाठी उपलब्ध करून देते. रजीस्ट्रार प्रमोद भिरूड यांच्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना अशी सुविधा देणारे हे महाविद्यालय एकमेव ठरते.या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांमध्ये डॉ. तुषार पाटील, डॉ. जमीर, डॉ. प्रिती साळुंके, डॉ. रघुराज यादव तसेच कर्मचारी गजानन जाधव, गोपाल नांदुरकर, रोशन महाजन, राजू धांडे, गुणवंत कोल्हे आदींचा समावेश होता.या शपथविधीने विद्यार्थ्यांमध्ये वैद्यकीय क्षेत्रातील नीतिमूल्ये आणि जबाबदारीबद्दलची भावना जागरूक झाली आहे.


Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads