जामगाव खुर्द ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा ; ७५ वर्षांपासून रस्त्यांची दयनीय अवस्था... - दैनिक शिवस्वराज्य

जामगाव खुर्द ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा ; ७५ वर्षांपासून रस्त्यांची दयनीय अवस्था...


समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर (कामती): मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडू जनजागृतीपर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असताना मोहोळ तालुक्यातील जामगाव येथील ग्रामस्थांनी गावात सुधारित रस्ते नसल्याने विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आला आहे.
    जामगाव खुर्दच्या ग्रामस्थांनी जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात स्वातंत्र्य मिळाल्यापासून ७५ वर्षांतील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. आमच्या गावाला जोडणारे एकूण चार रस्ते आहेत १.जामगांव- वडापूर रस्ता, जामगांव-अंत्रोळी रस्ता, जामगांव- कंदलगाव रसता व जामगांव खु. ते जामगांव बु. सद्यस्थितीत एकही रस्ता गावातील नागरिकांसाठी येण्या-जाण्यासाठी सोईचा नाही. प्रत्येक रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडलेले असल्याने या परिसरातील गावांना जोडणाऱ्या रस्त्यांवर खड्डे पडल्याने जीव मुठीत धरून प्रवास करावे लागत आहे.
 रस्ते गावातील व वाडीवस्त्यावरील खराब असल्याने पावसाळयात मुलांना सक्तीची शाळेला सुट्टी घ्यावे लागत आहे. २५ वर्षात आमदार व खासदार निधीमधून एकही नवीन रस्ता करण्यात आला नाही. त्यामुळे गावच्या विकासावर परीणाम होत आहे. म्हणून जामगाव खुर्दच्या आहे. म्हणून जामगाव खुर्दच्या ग्रामस्थांनी जिल्हाधिकार्यांना विधानसभा निवडणूकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads