दक्षिण मध्ये महादेव कोगनुरे यांचा गुप्त बैठकीवर जोर ; भाजप व काँग्रेसचे नाराज गट महादेव कोगनुरे यांच्या संपर्कात.... - दैनिक शिवस्वराज्य

दक्षिण मध्ये महादेव कोगनुरे यांचा गुप्त बैठकीवर जोर ; भाजप व काँग्रेसचे नाराज गट महादेव कोगनुरे यांच्या संपर्कात....


समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर (मंद्रूप) : दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार महादेव कोगनुरे यांचा आजचा दिवस विशेष करुन दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील शहर व ग्रामीण भागातील काँग्रेस व भाजप च्या नाराज गटा बरोबर गुप्त बैठका सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. भाजप व काँग्रेसचे नाराज गटांना एकत्रित करुन महादेव कोगनुरे हे कोणती नवीन राजकीय रणनीती आकतात हे पहाणे औत्सुक्य ठरणार आहे.
    आता हे नाराज गट जर एकत्रित येऊन महादेव कोगनुरे यांना बळ दिल्यास नक्कीच दक्षिण चे चित्र पालटणार असल्याचे बोलले जात आहे.सर्व सामान्य माणूस हा महादेव कोगनुरे यांच्या केंद्रस्थानी असल्याने सामान्य नागरिकांच्या सेवेसाठी नेहमीच महादेव कोगनुरे हे झटत असतात.यामुळेच मतदारसंघात महादेव कोगनुरे यांना मतदारांचा वाढता प्रतिसाद पहायला मिळत आहे.त्यातच आता दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील शहरी व ग्रामीण भागातील काँग्रेस व भाजपचे नाराज गट महादेव कोगनुरे यांच्या संपर्कात आल्यास दक्षिण मध्ये महादेव कोगनुरे यांची ताकद वाढण्यास मदत होणार आहे.इकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत मात्र नवचैतन्य पसरल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads