महाराष्ट्र
धर्मराज काडादीच्या गावभेट दौ-यास ग्रामस्थांकडून मोठा प्रतिसाद ....
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर (मंद्रूप) : गेल्या दहा वर्षात सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात कोणतीच विकासकामे झाली नाहीत. लोकप्रतिनिधींनी मतदारसंघाचा विकास साधणे अपेक्षित असताना केवळ गटातटात व गावागावात भांडणे लावण्याचे काम त्यांनी केले आहे.आज सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ समस्यांच्या विळख्यात सापडला आहे.मतदारसंघाला विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी सर्वांनी आपापल्या भरघोस मतांनी निवडून द्यावेत आपण निवडून आल्यावर मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधून प्रगतीचे, समृद्धीचे चित्र निर्माण करू अशी ग्वाही सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांनी दिली.
सोमवारी, अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांचा यत्नाळ, होटगी, हिपळे, इंगळगी, कणबस,शिरवळ,बोरूळ,बंकलगी,आहेरवाडी या गावात गावभेट दौरा झाला याप्रसंगी काडादी ते बोलत होते.
यावेळी स्वामी समर्थ सूतगिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे, सोलापूर बाजार समितीचे संचालक बाळासाहेब शेळके, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हरीश पाटील,माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील व भीमाशंकर जमादार, सिद्धेश्वर कारखान्याचे संचालक शिवानंद पाटील कुडल, माजी जिल्हा परिषद सदस्य एडवोकेट संजय गायकवाड,औज(मंद्रूपचे)
सिकंदरताज पाटील,कोळी समाजाचे जिल्हाध्यक्ष संजीव कुमार कोळी, प्राध्यापक डॉ.संतोष मेटकरी आदी उपस्थित होते.
यावेळी काडादी म्हणाले कि,भाजपकडे गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता होती मात्र त्यांच्याकडून दक्षिण सोलापूरसह सोलापूर जिल्ह्याचा विकास झाला नाही. देशमुख यांनी सहकारमंत्री हे पद भूषवले आहे मात्र ज्या वेगाने आणि ज्या पद्धतीने सोलापूर दक्षिणचा विकास होणे अपेक्षित होते तसे झाले नाही.आज गावोगावी रस्ते नाहीत, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, शेतीचा पाण्याचा आणि विजेचा प्रश्न बिकट आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र अनेक सुविधा नाहीत. गावागावात आणि सोलापूर शहरात पाण्याचा प्रश्न गंभीर आहे सोलापूर शहराला आठवड्यातून एकदा पाणी सोडले जाते,बससेवा विस्कळीत झाली आहे.सीना आणि भीमा नदीवर त्यांना बॅरेज आणि गावोगावी नवीन कालवे करता आले नाही. शंभर टक्के भरलेल्या उजनी धरणातून धुबधुबी प्रकल्पात पाणी सोडा म्हटल्यावर ते आकाशाकडे बोट दाखवून वरूनच पाऊस नाही,मी काय करू असे ते बेजबाबदार शेतकऱ्यांना बोलतात. त्यांना शेतकरी बांधवाबद्दल आस्था नाही. शेतकऱ्यांच्या पिकांना हमीभाव नाही, महागाई वाढली आहे.बेरोजगार युवकांची संख्या वाढत आहे.त्यांना
सोलापुरात आयटी पार्क आणता आले नाही. त्यामुळे येथील युवकांना पोटा-पाण्यासाठी स्थलांतर करावे लागत आहे. आपले अपयश झाकण्यासाठी गावागावात भांडणे लावली.स्वता:चा खासगी कारखाना चालावा म्हणून त्यांनी श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी व्देष भावनेनी पाडली आहे. शेतकऱ्यांच्या घरावर त्यांनी नांगर फिरविला आहे. तेव्हा अशा सूडाचे राजकारण करणाऱ्यांना या निवडणुकीत पराभूत करून सोलापूर दक्षिणच्या विकासासाठी आपल्याला भरघोस मतांनी विजयी करावेत असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी राजशेखर शिवदारे म्हणाले, धर्मराज काडादी हे काँग्रेस पुरस्कृत उमेदवार आहेत.गेल्या दहा वर्षांत भाजपने दक्षिण'चा विकास केला नाही.दक्षिण'चा सर्वांगीण विकास होण्यासाठी सुसंस्कृत आणि सज्जन व्यक्तीमत्व असलेले धर्मराज काडादी यांना मतदारांनी भरघोस मतांनी त्यांना विजयी करावेत असे आवाहन त्यांनी शेवटी बोलताना केले.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा