महाराष्ट्र
'दक्षिण'च्या अस्मिता आणि स्वाभिमानासाठी ही लढाई ; काडादी धर्मराज काडादीच्या गावभेट दौ-यास मोठा प्रतिसाद....
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर (मंद्रूप ): गेल्या दहा वर्षात सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात कोणतीच विकासकामे झाली नाहीत. लोकप्रतिनिधींनी मतदारसंघाचा विकास साधणे अपेक्षित असताना जनतेच्या हिताला बांधणारे कृत्य त्यांच्या हातून सातत्याने घडत आहे. सार्वजनिक हिताच्या संस्थेला त्रास देऊन ते बंद पाडण्याचे कारस्थान ते करीत आहेत.शेतकरी बांधवांचे श्रमाचे मंदिर आणि अस्मिता असणाऱ्या श्री.सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडण्याचे पाप भाजपच्या लोकप्रतिनिधींनी केले आहे त्यामुळे दक्षिण'च्या अस्मिताला आणि स्वाभिमानाला ठेच पोहचविणाऱ्या भाजपला या निवडणुकीत धडा शिकविणे गरजेचे आहे. या विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करून त्यांना बाजूला करून त्यांना'दक्षिण'चा स्वाभिमान दाखवून द्यावेत असे आवाहन विधानसभेचे अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांनी केले.शुक्रवारी अपक्ष उमेदवार सादेपूर,बाळगी,भंडारकवठे,तेलगाव,कुसूर,खानापूर, विंचूर, शंकरनगर या गावात गावभेट दौरा झाला यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर जिल्हा दूध संघाचे संचालक सुरेश हसापुरे, स्वामी समर्थ सूतगिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे, सोलापूर बाजार समितीचे संचालक बाळासाहेब शेळके, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हरीश पाटील, माजी सभापती भीमाशंकर जमादार, सिद्धेश्वर कारखान्याचे संचालक शिवानंद पाटील कुडल, विद्यासागर मुलगे, सुरेश झळकी, शिवशंकर बिराजदार, राजकुमार पाटील लक्ष्मण झळकी, माजी उपसभापती महादेव पाटील, सिकंदरताज पाटील, संतोष मेटकरी, कोळी समाजाचे जिल्हाध्यक्ष संजीवकुमार कोळी आदी उपस्थित होते.
🔴यावेळी काडादी म्हणाले,भाजपकडे गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतची सत्ता होती मात्र त्यांच्याकडून दक्षिण सोलापूरसह सोलापूर जिल्ह्याचा विकास झाला नाही. आज दक्षिण'मध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहेत गावोगावी रस्ते नाहीत, नवीन कालवे झाले नाहीत, जुन्या कालव्याची आणि सीना-भीमा नदीवरील बंधाऱ्यांची दुरुस्ती होऊ शकली नाही.नवीन बॅरेजेस करता आले नाही.आज पिण्याच्या पाण्याचा, शेतीच्या विजेचा आणि पाण्याचा प्रश्न बिकट आहे.आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला आहे.बेरोजगारी आणि महागाई प्रचंड वाढली आहे.त्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देता आले नाही आज, 'सोलापूर दक्षिण' विधानसभा मतदारसंघ समस्येच्या गर्तेत सापडला आहे.भाजपच्या लोकप्रतिनिधीला साधे मूलभूत प्रश्न सोडविता आले नाहीत.ते राज्याचे सहकार व वस्त्रोद्योग मंत्री झाले. त्यांना मतदारसंघात नवीन सहकारी संस्था अथवा प्रक्रिया उद्योग आणता आले नाही.सिद्धेश्वर कारखाना ५२ वर्षापासून शेतकऱ्यांच्या उसाला उच्चांकी भाव आम्ही देत कारखाना यशस्वीपणे चालविले आहे. कारखान्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे कल्याण झाले आहे. हे भाजपचा लोकप्रतिनिधींना पाहावले नाही.
आपला स्वतःचा खासगी कारखाना चांगला चालावा यासाठी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना बंद पाडण्याचे कुटील डाव आमदाराने खेळला आहे. वास्तविक पाहता कारखान्याची चिमणी ही विमानसेवेला अडसर ठरत नव्हती. मात्र, भाजपने जाणीवपूर्वक कारखान्याची चिमणी पाडली आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी शेतकऱ्यांच्या मालकीच्या कारखान्यावर घाव घालण्याचे काम भाजपच्या लोकप्रतिनिधींनी केला आहे.सध्या सोलापूर शहरात स्मार्ट सिटीचा नावाखाली दीड हजार कोटी रुपये खर्चून ही शहरातील प्रश्न सुटले नाहीत. आज सोलापूरला पाच-,सहा दिवसाआड पाणीपुरवठा होतो. बससेवा विस्कळीत झाली आहे हद्दवाढ भाग आणि जुळे सोलापुरातील जनतेला आजही मूलभूत सुविधांसाठी झगडावे लागत आहे.विकासकामे करण्याऐवजी केवळ, जातीपातीत आणि गटातटात भांडणे लावून ते निवडणूक जिंकत आहेत.सूडाचे आणि व्देषपूर्ण राजकारण करून जनतेला विकासापासून वंचित ठेवणा-या अशा लोकप्रतिनिधींना या निवडणुकीत बाजूला करणे गरजेचे आहे. सोलापूर दक्षिण'च्या विकासासाठी आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढवित आहोत जनतेने आपल्याला संधी दिल्यास सोलापूर दक्षिण मतदार संघासह सोलापूर शहराचा संपूर्ण कायापालट करू असा विश्वास काडादी यांनी शेवटी बोलताना व्यक्त केला.
🔴 यावेळी सुरेश हसापुरे म्हणाले,धर्मराज काडादी हे स्वच्छ प्रतिमेचे आणि चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्व आहेत. राजकारणापासून काडादी दूर होते आम्ही सगळ्यांनी आणि जनतेने आग्रह केल्यामुळे ते राजकारणात उतरले आहेत.जातीपातीचे आणि सूडाचे राजकारण करणाऱ्या भाजपला बाजूला करण्यासाठी आम्ही काडादी हे सक्षम पर्याय जनतेला दिला आहे तेव्हा जनतेनी काडादी यांच्यासारख्या उच्चशिक्षित स्वच्छ प्रतिमेच्या व्यक्तिमत्त्वाला निवडून द्यावीत.आम्ही निश्चितच सर्वजण मिळून तुमचे प्रश्न सोडवू असे त्यांनी शेवटी बोलताना सांगितले.
🔴यावेळी बाळासाहेब शेळके म्हणाले,आज दक्षिण' सोलापूरची अवस्था बिकट झाली आहे. कोणी येतोय आणि टिकली मारून जात आहे. त्यामुळे जनतेनी किमान या निवडणुकीत तरी जागृतपणे मतदान करणे गरजेचे आहे धर्मनिरपेक्ष विचार जपणारे,सर्वांना सोबत घेऊन जाणारे स्वच्छ प्रतिमेचे धर्मराज काडादी यांना निवडून देणे गरजेचे आहे.
🔴 शिवदारे म्हणाले कि ,काडादी परिवार गेल्या अनेक वर्षापासून सिद्धेश्वर परिवारातील संस्था उत्तमरीत्या चालवित असून या संस्थाचा त्यांनी मोठा विस्तार केला आहे.नेहमीच त्यांनी शेतकरी व सर्वसामान्य जनतेची कामे केली आहेत. निष्कलंक निगर्वी आणि आदर्श व्यक्तिमत्व असणारे काडादी यांच्यासारखे व्यक्ती आमदार होणे ही काळाची गरज आहे. तेव्हा त्यांना भरघोस मतांनी विजयी करा असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले.
🔴सिंचन क्षेत्र का? वाढविले नाही...
आपला खासगी कारखाना चालावा म्हणून भाजपचे लोकप्रतिनिधींनी जाणीवपूर्वक श्री सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पाडली आहे. खरे तर दहा वर्षे सत्तेत असून त्यांनी दक्षिण'मध्ये सिंचनाचा प्रश्न सोडविता आले नाही. त्यांनी सिंचनाचे प्रश्न सोडवून दक्षिण'मध्ये उसाचे क्षेत्र वाढण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित होते. मात्र तसे न करता शेतकरी मालकीचा सिध्देश्वर कारखाना बंद पाडून स्वतःचे कारखाना चालावा हा स्वार्थी दृष्टिकोन ठेवून भाजपने चिमणी पाडली आहे. सत्तेचा गैरवापर करून जनतेच्या सार्वजनिक संस्था बंद पाडण्याचे काम त्यांच्याकडून होत आहे खरंतर सत्ता ही लोकांच्या हितासाठी आणि कल्याणासाठी वापरायचे असते मात्र भाजप उलट पद्धतीने वागत आहे.तेव्हा अशा लोकांना या निवडणुकीत पराभूत करून त्यांना घरी बसवणे गरजेचे आहे.
*🔴मतविभागणी करू नका!*
दक्षिण सोलापूर तालुक्यात आणि सोलापुरात आप्पासाहेब काडादी,वि.गु.शिवदारे, आनंदराव देवकते, दिनानाथ कमळे(गुरूजी) बाबूराव चाकोते, ब्रम्हदेव माने, भीमराव पाटील-वडकबाळकर यांनी सुसंस्कृत आणि विकासाचे राजकारण केले आहे मात्र गेल्या दहा वर्षात भाजपने सोडायचे आणि देश पूर्ण राजकारण केले आहे अशांना बाजूला करणे गरजेचे आहे यासाठीच मला ज्येष्ठ नेते शरद पवार सुशीलकुमार शिंदे,विजयसिंह-मोहिते पाटील आणि प्रणिती शिंदे यांनी आपल्याला रिंगणात उतरविले आहे. त्यांचा मला पाठिंबा आहे काँग्रेसची सगळी नेतेमंडळी आपल्या सोबत आहेत. तालुक्यातील शिवदारे, शेळके, हसापुरे व इतर गट ही आपल्या सोबत आहेत. मतदारांनी जागृतपणे मतदान करावेत. तो माझा पाहुणा आहे,माझा मित्र आहे म्हणून कोणालाही मतदान करू नये. तसे केले तर मतविभागणी होऊन याचा फायदा भाजपला होईल.
भाजपला पराभूत करण्यासाठी सर्वांनी माझ्या 'कॉम्प्युटर' समोरील बटन दाबून मला भरघोस मतांनी विजयी करावेत असे आवाहन अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांनी यावेळी बोलताना केले.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा