महाराष्ट्र
शासकीय वसतिगृहासाठी इमारत भाडे तत्वावर देण्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन ....
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर :- शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहासाठी पंढरपुर जि. सोलापुर येथे इमारत भाड्याने घ्यावयाची आहे. सदर शासकीय वसतिगृहासाठी भाडेतत्वावर इमारत देण्यासाठी इच्छुक इमारत मालकांनी सहायक आयुक्त समाजकल्याण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सात रस्ता सोलापुर व गृहपाल मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, संभाजीराजे नगर, कोर्टी रोड, पंढरपुर येथे संपर्क साधावा असे आवाहन मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहाचे गृहपाल यांनी केले आहे.
सदर वसतिगृहासाठी मुलींना शाळा, कॉलेजच्या दृष्टीने मध्यवर्ती सोयीस्कर भागात 80 विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र खोल्या (30 ते 35), भोजन हॉल, स्वयंपाकगृह, धान्य, भांडारगृह, वीज, पाणी, शौचालय (संख्या 10), प्रसाधनगृहे (संख्या 10) इत्यादी सोयीनीयुक्त अशी कमीत कमी सर्वसाधारण 8500 चौ. फुट पक्के बांधकाम असलेली इमारत त्वरीत भाडयाने घ्यावयाची आहे. त्यामध्ये स्वतंत्र वीज व्यवस्था असावी, पिण्याच्या पाण्याची सोय असावी, वापरण्याच्या पाण्याची साठवणुकीची सोय असावी, तसेच इमारती भोवती संरक्षक भिंत असणे आवश्यक आहे. शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडुन प्रमाणित दराने इमारत भाडे मंजुर केले जाईल.
सदर इमारतीचे भाडे शासन स्तरावरुन मंजुर केले जाईल. इमारत भाडयाने घेण्याबाबतचे अधिकार सहायक आयुक्त् समाजकल्याण आयुक्तालय यांना आहेत.तरी इच्छुक इमारत मालकांनी जागेची कागदपत्रे नकाशासह 7 दिवसाच्या आत मा. सहायक आयुक्त समाजकल्याण सोलापुर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सात रस्ता सोलापुर (दुरध्वनी क्रमांक 0217-2734950) व गृहपाल मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, संभाजीराजे नगर, कोर्टी रोड, पंढरपुर (दुरध्वनी क्रमांक 02186-295832) यांच्याकडे तात्काळ संपर्क साधावा असे आवाहनही शासकीय वसतिगृहाचे गृहपाल यांनी केले आहे.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा