अन्न व औषध प्रशासनाची धडाकेबाज कारवाई ; 69 लाख 45 हजाराची रंगमिश्रीत सुपारी जप्त... - दैनिक शिवस्वराज्य

अन्न व औषध प्रशासनाची धडाकेबाज कारवाई ; 69 लाख 45 हजाराची रंगमिश्रीत सुपारी जप्त...


समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर :- सोलापूर येथील विजापुर रोड, नांदणी टोल नाका, ता.दक्षिण सोलापूर येथे टाटा कंपनीचे 12 टायर वाहन क्र-आर.जे-11- जीसी-9118 या वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये 24 हजार 498 किलो वजनाची रंगमिश्रीत व निकृष्ट दर्जाची सुपारी आढळून आली. सदर मालाची किंमत सुमारे 69 लाख 45 हजार 183 रुपये इतकी असून, हा साठा जप्त करण्ययात आला असल्याची माहिती रुपये सहायक आयुक्त (अन्न) साहेबराव देसाई यांनी दिली.
        सहायक आयुक्त (अन्न) सा.ए.देसाई यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली असून, अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती अस्मिता टोणपे यांनी किटकबाधीत व रंग मिश्रीत सुपारी अन्न पदार्थाचा नमुना विश्लेषणासाठी घेऊन, उर्वरित 24 हजार 498 किलो, किंमत 69 लाख 45 हजार 183 रुपयेचा साठा कमी दर्जाच्या संशयावरून जप्त करून ताब्यात घेतला आहे. सदर प्रकरणी अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत पुढील कारवाई सुरू आहे.
सदरची कारवाई सहायक आयुक्त साहेबराव देसाई, अन्न सुरक्षा अधिकारी व श्रीमती अस्मिता टोणपे तसेच नमुना सहायक श्रीशैल हिटनळ्ळी यांच्या पथकाने केली असल्याचे अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त (अन्न) श्री.देसाई यांनी कळविले आहे.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads