मंत्री गिरीश महाजन यांना अखेर जलसंपदा (विदर्भ, तापी, कोकण विकास) आणि आपत्ती व्यवस्थापन खात्याची जबाबदारी
दि. 21 डिसेंबर - राज्याचे नेते आणि प्रभावी मंत्री गिरीश महाजन यांनी आज अखेर जलसंपदा (विदर्भ, तापी, कोकण विकास) आणि आपत्ती व्यवस्थापन या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी मिळाली आहे. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर महाजन यांना कोणते खाते मिळणार सर्वांना उत्सुकता लागली होती अखेर आज त्यांना जलसंपदा (विदर्भ, तापी,कोकण विकास) या खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
गिरीश महाजन यांचा प्रशासनातील अनुभव आणि कार्यक्षम नेतृत्व लक्षात घेता या खात्यांमध्ये लक्षणीय बदल घडण्याची शक्यता आहे. विशेषतः विदर्भ, तापी आणि कोकण विकास प्रकल्प, सिंचन व्यवस्था सुधारणा आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा बळकट करण्यावर भर दिला जाणार आहे.
राज्यात जलसंपदा विकासाला मिळणार गती!
महाजन यांनी यापूर्वी ग्रामविकास खात्यात उल्लेखनीय कामगिरी करून लोकांचा विश्वास मिळवला आहे. आता त्यांच्या नेतृत्वाखाली जलसंपदा प्रकल्पांची गती वाढेल, पाणीटंचाई दूर होईल आणि आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
जळगाव आणि जामनेरमध्ये जल्लोष!
या बातमीने महाजन यांचे समर्थक आणि नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. जामनेरमध्ये फटाक्यांची आतषबाजी आणि जल्लोष साजरा करण्यात येत आहे.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा