जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे जामनेरात भव्य स्वागत..... - दैनिक शिवस्वराज्य

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे जामनेरात भव्य स्वागत.....

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जामनेर, ता. २२ डिसेंबर - जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे आज जामनेरात भव्य स्वागत करण्यात आले. जळगाव रोड ते नगरपालिका पर्यंत काढलेल्या भव्य रॅलीने संपूर्ण शहरात जल्लोषाचे वातावरण निर्माण केले.

ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांची आतषबाजी आणि गुलाल उधळत कार्यकर्त्यांनी गिरीश महाजन यांचे जोरदार स्वागत केले. शहरभर "गिरीशभाऊंचा विजय असो" च्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी उत्साहाची लाट निर्माण केली.

स्वागत रॅलीसाठी आकर्षक सजावट, लेझीम पथकांचे सादरीकरण आणि गाड्यांची भव्य रांग विशेष आकर्षण ठरली. हजारोंच्या संख्येने उपस्थित कार्यकर्त्यांनी महाजन यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले.

नगरपालिका चौकात महाजन यांनी नागरिकांना संबोधित करत, "जामनेरच्या विकासासाठी माझी कटिबद्धता कायम राहील," असे आश्वासन दिले.

या ऐतिहासिक स्वागत सोहळ्यात शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती, व्यापारी, सामाजिक संस्था आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. महाजन यांच्या आगमनाने जामनेरचा उत्साह शिगेला पोहोचला!

Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads