महाराष्ट्र
'जुन्या लोप पावत चाललेल्या पारंपारिक खेळांना क्रीडा सप्ताहामध्ये स्थान द्यावे :- भीमराव परीक्षाळे साने गुरुजी विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय अंत्रोळी येथे क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन संपन्न....
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर (मंद्रूप) : साने गुरुजी विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्याल अंत्रोळी येथे शैक्षणिक वर्ष सन 2024 -25 मध्ये क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ अंत्रोळी या संस्थेचे सचिव भीमराव परीक्षाळे यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रथमता शैक्षणिक वर्ष सन 2024 -25 शैक्षणिक वर्षात आयोजित केलेल्या शैक्षणिक सहलीमध्ये यशस्वी काम केल्याबद्दल संस्थेचे सचिव भिमराव परीक्षाळे यांच्या हस्ते सहलीमध्ये यशस्वी काम केल्याबद्दल मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी खेळाचे महत्व विशद करताना आपल्या मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, शरीर संपत्ती ही सर्वोत्कृष्ट संपत्ती आहे त्यासाठी विद्यार्थ्यांनी व्यायाम करणे अत्यावश्यक आहे व तसेच खेळामध्ये सहभाग घेऊन तालुका, जिल्हा तसेच राज्य पातळीवर आपल्या शाळेचे पालकांचे, गावाचे नाव रोशन करावे व तसेच जुने खेळ जे लोप पावत चाललेले आहेत त्या खेळांना पुनरुज्जीवित करण्यासाठी वेगवेगळ्या क्रीडा सप्ताहामध्ये जुन्या खेळांना स्थान द्यावे असे विचार व्यक्त केले.
यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक नुरुद्दिन शेख, दिलशाद पठाण, गजानन कोले, दत्तात्रय शिंदे, रवींद्र गावित, सोमनाथ साळुंखे, माळाप्पा वडरे, बसवराज चौगुले, गोपाळ पाटील, शर्मा सुतार, उमाकांत कांबळे इत्यादी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन कोले यांनी केले तर आभार प्रदर्शन दत्तात्रय शिंदे यांनी मानले.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा