महाराष्ट्र
साने गुरुजी यांचे विचार प्रेरणादायी :- अस्मिता बालगावकर साने गुरुजीगुरुजी जयंती निमित्त अनिस कडून विविध कार्यक्रमांचे आयोजन...
साने गुरुजी जयंती साजरी करताना उत्स्फूर्तपणे उत्तरे देणाऱ्या विद्यार्थिनींना पुस्तकं बक्षिसे देताना अनिस चे कार्याध्यक्ष डॉ. अस्मिता बालगावकर, विविध उपक्रम विभाग प्रमुख आर. डी. गायकवाड आणि मुख्याध्यापक बोधीप्रकाध गायकवाड.
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर : सध्याची राज्यातील सामाजिक स्थिती गंभीर आहे त्यामुळे अशा भयावहस्थिती सामान्य माणसांना जीवन जगणे अशक्य झाले आहे अशा स्थितीत साने गुरुजी यांचे विचार प्रेरणादायी आहेत त्याचे चिंतन आणि म्हणून केल्यास जीवन सुखकर होईल असा आशावाद अंधश्रद्धा निर्मूलन समिती शहर शाखेच्या कार्याध्यक्ष डॉ. अस्मिता बालगावकर यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोलापूर शहर शाखेच्या वतीने बॅरिस्टर बाबासाहेब भोसले प्रशाला कासेगाव, सोलापूर येथे 125 व्या सानेगुरुजी जयंतीनिमित्त साने गुरुजीं आणि आजची सामाजिक परिस्थिती या विषयावर व्याख्यान देताना त्या बोलत होत्या यावेळी डॉ अस्मिता बालगावकर यांनी चमत्कार मागील विज्ञान हा कार्यक्रम वैज्ञानिक प्रयोगांआधारित सादर केला. उपक्रम विभाग प्रमुख आर. डी. गायकवाड हे उपस्थित होते.
आजच्या गंभीर सामाजिक परिस्थितीत शिक्षक पालक त्यांचे विचार आणि तत्त्वज्ञान समाजाला विवेकाकडे आणि संवेदनशीलते कडे घेऊन जातील असा विश्वास डॉ. अस्मिता बालगावक यांनी व्यक्त केला.
अनेक वैज्ञानिक प्रयोग करून त्यांनीभोंदू बाबा लोकांना कसे फसवतात याचे प्रात्यक्षिक करून दाखविले विशेषतः विद्यार्थ्यांना चिठ्ठी वाले बाबा प्रयोग आवडला. त्यास मुलांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत कार्यक्रमात सहभाग नोंदविला. उत्तरे देणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना डॉ दाभोळकर यांची पुस्तके, लोकविज्ञान प्रकाशित पुस्तके, अंधश्रद्धा निर्मुलन वार्तापत्रचे अंक बक्षीस म्हणून देवून सत्कार करण्यात आला. शेवटी अनेक विद्यार्थी व शिक्षकांनी प्रश्नोत्तरे वर चर्चा करून सर्वांनी आपली जिज्ञासा आणि शोधक बुध्दीचे सादरीकरण केले.
या कार्यक्रमास मुख्याध्यापक बोधीप्रकाश गायकवाड , काशिनाथ जंगलगी, सिद्धारू साळुंके, मल्लाप्पा कोळी, हरून तांबोळी, पांडुरंग घुले, विजयसिंह पाटील, प्रमोद कुलकर्णी, प्रतिभा आष्टे, अक्षय पाटील यांच्यासह 200 विद्यार्थी उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा