जामनेरात भरदिवसा धाडसी चोरी – लाखोंचा ऐवज लंपास - दैनिक शिवस्वराज्य

जामनेरात भरदिवसा धाडसी चोरी – लाखोंचा ऐवज लंपास

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जामनेर शहरातील नवकार प्लाझा परिसरात माजी उपनगराध्यक्ष श्रीराम महाजन यांच्या मुलाच्या घरात भरदिवसा चोरीची धक्कादायक घटना घडली आहे. सकाळी ९ ते १० च्या दरम्यान चोरट्यांनी घराचा कडी-कोंडा तोडून आत प्रवेश केला आणि ६ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.किरण श्रीराम महाजन, जे शिक्षक आहेत, हे सकाळी आपल्या पत्नीसह नोकरीसाठी शाळेत गेले होते. त्यांच्या अनुपस्थितीत चोरट्यांनी कपाटातून ५० ग्रॅम सोनं आणि रोख रक्कम लंपास केली. विशेष म्हणजे, चोरट्यांनी इमारतीमधील सीसीटीव्ही कॅमेरे आधीच तोडून टाकले होते, ज्यामुळे या चोरीची पूर्वनियोजन असल्याचा संशय निर्माण झाला आहे.चोरीची माहिती मिळताच जामनेर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी फिंगरप्रिंट तज्ज्ञ आणि डॉग स्क्वॉड पथकाला पाचारण करून तपासाला सुरुवात केली आहे. प्राथमिक चौकशीत असे उघड झाले की चोरीस गेलेली रोख रक्कम दोन दिवसांपूर्वीच बँकेतून काढण्यात आली होती. त्यामुळे कोणीतरी महाजन कुटुंबाच्या हालचालींवर लक्ष ठेवून असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.भरदिवसा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी अशी चोरी झाल्याने जामनेर शहरात खळबळ उडाली आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला असून, लवकरच चोरांना गजाआड करण्यात येईल असा विश्वास व्यक्त केला आहे.जामनेरमधील या प्रकाराने पुन्हा एकदा सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत जागरूकता वाढवण्याची गरज अधोरेखित केली आहे.

Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads