वाघुर उपसा सिंचन देशातील अभिनव प्रकल्प ठरणार..जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी केली पाहणी - दैनिक शिवस्वराज्य

वाघुर उपसा सिंचन देशातील अभिनव प्रकल्प ठरणार..जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी केली पाहणी

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जामनेर तालुक्याला संजीविनी असलेला वाघुर उपसा सिंचन क्रमांक 1 हा प्रकल्प देशाचा अभिनव प्रकल्प ठरेल त्यासाठी प्रारंभी पासूनच कामाचा दर्जा व तांत्रिक बाबींवर लक्ष ठेवण्याची गरज नव्याने जलसंपदा खात्याचा कारभार हाती घेतलेले मंत्री गिरीशभाऊ महाजन यांनी बोलून दाखवली.आज मंगळवार, 24 रोजी त्यांनी प्रकल्पाच्या स्थळाची पाहणी केली.

जामनेर तालुक्यातील करमाड व नेरी परिसरातील वाघूर उपसा सिंचन क्रमांक १ अंतर्गत तयार करण्यात येत असलेल्या शेततळ्यांची त्यांनी पाहणी केली.यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,वाघुर धरण विभागाचे कार्यकारी अभियंता गोकुळ महाजन हे सुद्धा उपस्थित होते. शेततळ्याच्या माध्यमातून या भागातील शेतकऱ्यांना अधिक सिंचनाची सुविधा मिळणार असून,कृषी उत्पादनामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर वाढ होणार आहे.

55 हजार 971 हेक्टर जमीनीला लाभ 
वाघुर उपसा प्रकल्प अंतर्गत 4 हजार शेततळी तयार करण्यात येणार असून त्याद्वारे 29 हजार 655 हेक्टर सिंचनाचा लाभ मिळणार आहे.शेतकऱ्यांना शेततळ्यांद्वारे शाश्वत पाणीपुरवठा उपलब्ध होणार असल्याने पीक घेण्याचे स्वातंत्र्य राहणार आहे,त्यामुळे 
शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे.प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेऊन जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन यांनी आवश्यक सूचना केल्या.
तसे या शेततळ्याच्या माध्यमातून मत्स्य उद्योगाला मोठी चालना मिळून रोजगार च्या अनेक संधी उपलब्ध होणार असल्याने हा प्रकल्प जामनेर तालुक्या करता संजीवनी ठरणार आहे
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads