लोकशाहीच्या रक्षणासाठी सरपंच परिषदेचे एल्गार – ७ जानेवारीला आझाद मैदानावर धरणे आंदोलन
केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या घटनेने राज्यभरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ही घटना लोकशाहीच्या मूल्यांना हादरा देणारी असून पंचायत राज व्यवस्थेवर थेट हल्ला असल्याचे मत सरपंच परिषदेचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष राजमल भागवत यांनी व्यक्त केले.
या घटनेच्या निषेधार्थ आणि दोषींवर कठोर कारवाईसाठी सरपंच परिषदेच्या वतीने ७ जानेवारी रोजी मुंबईतील आझाद मैदानावर एक दिवसीय धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. राजमल भागवत यांनी जळगाव जिल्ह्यातील सर्व सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे (पाटील) करणार असून पंचायत राज व्यवस्थेचे रक्षण आणि लोकशाही मूल्यांची पुनर्स्थापना करण्यासाठी हा एल्गार पुकारण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
युवराज पाटील - जळगाव जिल्हा समन्वयक
राजमल भागवत - विभागीय अध्यक्ष
श्रीकांत पाटील - जिल्हा सरचिटणीस
बाळू धुमाळ - जळगाव जिल्हा अध्यक्ष
बाळू चव्हाण - जामनेर तालुका समन्वयक
या आंदोलनाच्या माध्यमातून दोषींवर कठोर कारवाई, सरपंचांच्या सुरक्षेसाठी कडक उपाययोजना आणि पंचायत राज व्यवस्थेच्या सक्षमीकरणासाठी मागण्या करण्यात येणार आहेत.राजमल भागवत यांनी आवाहन केले आहे की, जळगाव जिल्ह्यातील सर्व सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनी लोकशाहीच्या रक्षणासाठी या आंदोलनात एकजुटीने सहभागी व्हावे.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा