महाराष्ट्र
राज्यस्तरीय लंगडी स्पर्धेत महर्षी शिंदे विद्यालय एनकुळचा डंका...
एनकुळ/वडूज प्रतिनिधी :- रविना यादव
राज्यस्तरीय शालेय लंगडी स्पर्धा 2024 -25 उदगीर जिल्हा लातूर या ठिकाणी नुकत्याच पार पडल्या .या स्पर्धेमध्ये श्री महर्षी शिंदे विद्यालय एनकूळ, तालुका खटाव, जिल्हा सातारा येथील 19 वर्षाखालील मुलांच्या संघाने *कास्यपदक* प्राप्त केले. या संघामध्ये यश वनवे विशाल खाडे ,प्रतीक तुपे ,बाबू चव्हाण ,अक्षय येलमर ,ऋतुराज शिंदे, प्रज्वल यादव , यशराज सानप , निखिल फडतरे, रोनीत खैरमोडे, आयुष शिंदे, संकेत जाधव, विवेक जाधव, प्रथमेश माळवे , अविनाश थोरवे या खेळाडूंचा सहभाग होता .
या स्पर्धेचा पहिला जिल्हास्तरीय सामना माणदेशी क्रीडा संकुल म्हसवड येथे पार पडला.यामध्ये एनकुळच्या संघाने प्रथम क्रमांक मिळवला.तसेच विभागीय क्रीडा स्पर्धा याच माणदेशी क्रीडांगणावरती संपन्न झाल्या यामध्येही या संघाने विजयी पदक मिळवत राज्यस्तरीय स्पर्धेमधे प्रवेश मिळवला.दि.२८ डिसेंबर ते ३० डिसेंबर रोजी तीन दिवस उदगीर जिल्हा लातूर या ठिकाणी राज्यस्तरीय शालेय लंगडी स्पर्धा २०२४-२५ पार पडल्या यामध्ये उत्कृष्ठ कामगिरीकरत अंतिम फेरीत बाजी मारुन श्री महर्षी शिंदे विद्यालय एनकूळचा १९ वर्षाखालील या मुलांच्या संघाने कास्यपदक मिळवून घवघवीत यश संपादन केले. आणि फक्त आपल्या शाळेचेच नाही तर संपूर्ण गावाचे ,तालुक्याचे तसंच जिल्ह्याचे नेतृत्त्व करत राज्यपातळीवर आपला डंका गाजवला आहे .
खरतर अनेक रुढी परंपरा आजकाल लोप पावत चाललेल्या आहेत ते आपण पाहतो.अशातच ग्रामीण भागातील मुले लंगडी सारखे जुने खेळ अजूनही खेळतात आणि त्यांना ते अवगत होतात याचाही अभिमानच वाटतो.खरतर असे अनेक खेळ फक्त राज्य लेव्हल पर्यंतच खेळवले जाऊ नयेत तर या खेळांना ऑलिंपिक मधे दर्जा मिळाला पाहिजे.
२८ ते ३० डिसेंबर रोजी झालेल्या या राज्य स्पर्धेत तृतीय क्रमांक आल्याबद्दल श्री महर्षी शिंदे विद्यालय या संघाचा चेतन पागावाड सचिव, महाराष्ट्र राज्य लंगडी असोसिएशन यांच्यामार्फत संघाला सन्मानचिन्ह ट्रॉफी व प्रत्येक खेळाडूला मेडल देवून गौरवण्यात आले.
या सर्व विजयी खेळाडूंना श्री महर्षी शिंदे विद्यालयाचे क्रीडा शिक्षक रमेश सरगर यांचे मार्गदर्शन लाभले.त्याचबरोबर विजयी खेळाडूंचे अभिनंदन विद्यालयाचे प्राचार्य श्री राजमाने सर , सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, स्कूल कमिटी सदस्य, सर्व पंचक्रोशीतील ग्रामपंचायतीचे सरपंच, सर्व पालक, सातारा जिल्हा लंगडी असोसिएशनच्या अध्यक्षा श्रीमती चेतना सिन्हा, सचिव -उदय कुमार जाधव , क्रीडा शिक्षक श्री हिरालाल काटकर सर यांनी अभिनंदन केले
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा