कोल्हापूर
महाराष्ट्र .
महावितरणच्या ताराबाई पार्कातील मुख्य कार्यालयाला गनिमी काव्याने टाळे ठोकले
प्रतिनिधी / आकाश बारड :-
कोल्हापूर : लॉकडाऊन काळातील घरगुती वीज बिले माफ करा या मागणीसाठी सर्वपक्षीय कृती समिती आणि महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनच्या कार्यकर्त्यांनी महावितरणच्या ताराबाई पार्कातील मुख्य कार्यालयाला मंगळवारी गनिमी काव्याने टाळे ठोकले.
टाळे ठोकल्यानंतर आंदोलकांनी कर्मचार्यांना कार्यालयात जाण्यास मज्जाव केला. गुलाब पुष्प देऊन गांधीगिरी पद्धतीने आंदोलकांनी कर्मचार्यांना परत पाठविले.
त्याचवेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून कुलूप काढले यावेळी पोलिस आणि आंदोलकांत जोरदार झटापट झाली. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक केली,पण ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना तातडीने सोडा अशी मागणी करून आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली तर काही कार्यकर्ते पोलिस गाडीसमोर आडवे झोपले त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांना सोडून दिले.
यावेळी वीज बिले भरणार नाही, वीज बिले माफ झाली पाहिजेत, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी महावितरणच्या चार ते पाच दरवाजांसमोर आंदोलकांनी ठिय्या मारून कर्मचार्यांना कार्यालयात जाण्यास बंदी घालण्यात आली.
दुपारी दोन वाजेपर्यंत ठिय्या आंदोलन करून अधिकार्यांना निवेदन देण्यात आले.
दिवाळीपर्यंत निर्णय घ्या,अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलनास सामोरे जावे लागेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा