कंत्राटी वैद्यकिय शिक्षकांच्या सामूहिक रजा आंदोलनाला मा.माणिकराव ठाकरे यांची भेट : वैद्यकिय शिक्षण मंत्र्यांशी बोलून तोडगा काढण्याचे दिले आश्वासन - दैनिक शिवस्वराज्य

कंत्राटी वैद्यकिय शिक्षकांच्या सामूहिक रजा आंदोलनाला मा.माणिकराव ठाकरे यांची भेट : वैद्यकिय शिक्षण मंत्र्यांशी बोलून तोडगा काढण्याचे दिले आश्वासन


यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी /संजय कारवटकर :-
भाजपप्रणित सरकारने पाच वर्षे आश्वासनावर ठेवून वैद्यकिय शिक्षकांच्या तोंडाला पाने पुसली.कोरोनाच्या आणिबाणीच्या काळात कंत्राटी वैद्यकिय शिक्षकांनी जीवाची पर्वा न करता काम केले परंतु त्यांना अजूनही न्याय मिळालेला नाही.
यासबंधी माजी विधानपरिषद उपाध्यक्ष मा.माणिकराव ठाकरे साहेबांनी यवतमाळ येथील वैद्यकिय शिक्षकांच्या सामूहिक रजा आदोंलनाला आज भेट देवून शिक्षकांच्या समस्या जाणून घेतल्या. वैद्यकिय शिक्षण मंत्र्यांशी याबद्दल चर्चा करून न्याय देण्यात येईल असे आश्वासन मा.माणिकराव ठाकरे साहेबांनी दिले.यावेळी डॅा.आनंद सारस्वत,डॅा.सतिश पवार,डॅा.तेजस मडावी तसेच माजी युवक काँग्रेंस सरचिटणीस रितेश भरूट,युवक काँग्रेंस विधानसभा अध्यक्ष नंदकिशोर ठाकरे उपस्थित होते.

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads