प्रियकराने लग्नाला नकार दिला म्हणून प्रेयसीने मारली शिवाजी पूलावरून उडी - दैनिक शिवस्वराज्य

प्रियकराने लग्नाला नकार दिला म्हणून प्रेयसीने मारली शिवाजी पूलावरून उडी


प्रतिनिधी / आकाश बारड :-
कोल्हापूर : पंचगंगा नदीत गुरुवारी दुपारी दीड वाजता  प्रियकराने लग्नाला नकार दिल्याने टोकाची भुमिका घेत प्रेमीयुगुलाने नदीत उडी टाकून आत्महत्येचा प्रयत्‍न केला.
 २७ वर्षीय प्रेयसीने शिवाजी पुलावरून पंचगंगा नदीत उडी मारली,बुडणाऱ्या प्रेयसीला  वाचवण्यासाठी प्रियकराने शिवाजी  पुलावरून उडी घेतली. 
 रणवीर नाळे (बुधवार पेठे, वय २६) याने स्वतःचा जीव धोक्यात घालून दोघांना वाचवले.दोघांनाही उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. 
या सर्व घटनेमध्ये वाहतूक शाखेचे कॉन्स्टेबल संदीप निळपण जखमी झाले.

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads