आता अशिक्षित व्यक्तीही होवू शकतो सरपंच - दैनिक शिवस्वराज्य

आता अशिक्षित व्यक्तीही होवू शकतो सरपंच

यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी/संजय कारवटकर :-
येत्या ग्रामपंचायतची निवडणूक पारंपरिक पद्धतीने होणार आहे.थेट जनतेतून सरपंच पद्धत बंद करण्यात आल्याने आता जुन्या पद्धतीने म्हणजे ग्रामपंचायत सदस्यांतुन सरपंच्याची नियुक्ती करण्यात येणार आहे.
 त्यामुळे आता शिक्षणाची अट सुध्दा रद्द झाली आहे. त्यामुळे सरपंच हा अशिक्षित व्यक्तीही होवू शकतो भाजप सरकारच्या काळात महाराष्ट्र ग्रामपंचायत कायदात दुरस्ती करून सरपंच्याची थेट जनतेतून निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे दोन वर्षे सरपंच्यावर अविश्वास प्रस्ताव न आणण्याची अट घालण्यात आली होती त्याचप्रमाणे 7 वा वर्ग पास ची सुध्दा अट घालण्यात आली होती, मात्र आता तसे नसल्याने निवडणूक पार पडल्यानंतर सरपंच्याचे आरक्षण निघणार असल्याने सरपंच हा अशिक्षित किंवा शिकलेला सुध्दा होवू शकतो.

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads