नागरीकांना कायदा हातात घेण्यास भाग पाडु नका ; शंभुराजे फरतडे
करमाळा तालुका प्रतिनिधी /अंगद भांडवलकर :-
करमाळा तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याच्या त्रासामुळे तेथील लोकांच्या सहनशक्तीचा आंत होत चालला बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त, नागरीकांना कायदा हातात घेयला भाग पाडु नका असे आवाहन शिवप्रताप युवा प्रतिष्ठान चे संस्थापक व सा चौफेर चे पत्रकार शंभुराजे फरतडे यांनी प्रशासनाला केले आहे.
बिबट्यातर सोडा वनविभागाला साधा "तरसा" चा बंदोबस्त होत नाही हे दुर्दैव आहे सद्यस्थितीला लोकं कायदा हातात घेतील की काय अशी शक्यता आहे.
बिबट्याच्या प्रश्नावर प्रशासन गाफील राहीले तर नागरीक कायदा हातात व बिबट्याच्या दहशतीत आसणाऱ्या परिसरातील लोक वन विभाग आणि प्रशासनाविरुद्ध आपला रोष व्यक्त करुन वनविभाग आणि प्रशासनाला गाव बंदी केल्या शिवाय राहणार नाहीत ते स्वतःच कायदा हातात घेऊन नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करण्याच्या तयारीत येतील. अशा परिस्थितीमुळे इथून पुढे वाघ सदृश्य किंवा वाघ व बिबट्या या प्राण्याच्या जीविताला संपूर्ण धोका निर्माण झाल्यास याची जबाबदारी वनविभाग घेणार आहे का?याचे उत्तर वनविभाग व प्रशासनानी द्यावे.
यवतमाळ जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या अवनी वाघिणीच्या त्रासामुळे जानेवारी 2018 मध्ये यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर तहसीलदारांची गाडी पेटवून गावकऱ्यांनी आपला रोष व्यक्त केला होता अशी परिस्थिती करमाळा तालुक्यात परत घडते की काय याची भीती वाटून राहिली आहे.
तसेच अकलूज आणि बारामती तालुक्यातील शूटर नेमल्यानेही वेगळाच गोंधळ सध्या करमाळा तालुक्यात निर्माण झाला आहे राजकीय वरदहस्तामुळे या "राजकीय पुढाऱ्यांची?" "शूटर" म्हणून नेमणूक झाली आहे असेही बोलले जात आहे त्यामुळे बिबट्याच्या प्रश्नावर राजकारण करणाऱ्यांनी भानावर येण्याची गरज आहे.
अवनी वाघीणीचा घनदाट जंगलात दोन महिन्यात बंदोबस्त करणाऱ्या हैदराबाद येथील नवाब शपात आली खान व अजगर आली खान यांना का पाचारण केले जात नाही आसा सवाल देखील फरतडे यांनी ऊपस्थीत केला आहे.
या पुढे बिबट्याचा बंदोबस्त होण्या आगोदर एकजरी निष्पाप बळी गेल्यास वनविभाग व प्रशासनाच्या विरोधात तालुक्यातील नागरीकांसह शिवप्रताप युवा प्रतिष्ठान च्या वतीने भव्य मोर्चा काढला जाईल यांची नोंद घ्यावी.
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा