कोल्हापूर
महाराष्ट्र .
शिवसाम्राज्य युवा प्रतिष्ठान बारडवाडी यांच्या मार्फत रक्तदान शिबीर संपन्न
प्रतिनिधी / आकाश बारड :-
राधानगरी तालुक्यातील बारडवाडी येथे शिवसाम्राज्य युवा प्रतिष्ठान यांच्या मार्फत दि १७ रोजी, मा.अनिकेत बारड (उपाध्यक्ष राधानगरी तालुका ,राष्ट्रवादी युवक कांग्रेस)यांच्या वाढदिसानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न झाले.
महाराष्ट्रासह कोल्हापुरातील रक्तपेढीतून साधारण ५ ते ६ दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा शिल्लक असून, आपण हि समाजासाठी काहीतरी देणं लागतो हा विचार करून वाढदिवसाचा अवाढव्य खर्च टाळत भैरवनाथ मंदिर बारडवाडी येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.
रक्तदान शिबिरास बारडवाडी गावातील ग्रामस्थ तसेच युवा वर्गातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शिबिराला संजीवनी रक्तपेढी ( कोल्हापूर ) यांचे सहकार्य लाभले.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा