शाहूवाडी तालुक्यातील पेरीड गावात अजब प्रकार गावामध्ये शुन्य टक्के मतदान
शाहूवाडी प्रतिनिधी / आनंदा तेलवणकर
शाहूवाडी तालुक्यातील पेरीड गावामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज 0 टक्के मतदान झाले .मतदान केंद्रावर शासकीय यंत्रणा कार्यरत होती .परंतु एकही मतदार मतदान केंद्राकडे फिरकला नाही. दिवसभर मतदान केंद्र ओस पडलेले होते .
कारण असे होते की ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून गेली 68 वर्षे येथे निवडणूक झाली नव्हती. दरवर्षी ही निवडणूक बिनविरोध होतं होती ही येथील परंपरा होती .मात्र यावेळी एकूण नऊ जागा पैकी आठ जागा बिनविरोध झाल्या मात्र एका जागेसाठी येथे निवडणूक लागली मात्र, बिनविरोध गावाची परंपरा मोडीत निघणार होती. म्हणून आज गावातील एकही मतदार मतदान केंद्राकडे फिरकला नाही . तसेच स्वतः उमेदवारही मतदान केंद्राकडे मतदानासाठी नाही. त्यामुळे येथील मतदान केंद्रावर दिवसभर शुकशुकाट दिसून येत होता . त्यातूनच गावची एकी पुन्हा एकदा दिसून आली.
Previous article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा