ग्रामीण पत्रकारांच्या उन्नतिसाठी युवा पत्रकार संघाचा पुढाकार ; संघाच्या महिला आघाडीची गडहिंग्लज तालुक्याची धुरा चित्रा शिंदे यांच्यावर
पन्हाळा तालुका प्रतिनिधी / आशिष पाटील :-
महिला भगिनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महत्वाच्या जबाबदारी पार पाडू शकतात याची नोंद घेऊन युवा पत्रकार संघांचे संस्थापक शिवाजी शिंगे युवा पत्रकार संघाच्या गडहिंग्लज तालुका महिला आघाडी अध्यक्षपद पत्रकारिता आणि सामाजिक कार्य अश्या दोन्ही क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या नेसरी येथील महिला पत्रकार सौ.चित्रा शिंदे यांची निवड केली आहे.
तसेच यावेळी युवा पत्रकार संघाच्या महिला आघाडी राज्य अध्यक्षा सौ अर्चना चव्हाण यांच्या हस्ते त्यांना समारंभ पूर्वक निवडीचे पत्र देण्यात आले. संघांचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंगे, जिल्हाध्यक्ष -संदीप शिंदे,जिल्हा सचिव -संतोष पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. राज्य महिला अध्यक्षा सौ. अर्चना चव्हाण यांनी महिला पत्रकारांनी स्वावलंबी होण्याच्या गरजेवर भर दिला पाहिजे असे मनोगत व्यक्त केले.तसेच संघांचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंगे यांनी, शासकीय योजना, आरोग्य विमा, संरक्षण, श्रमिक पत्रकारांना व त्यांच्या कुटुंबियांना कशी मिळवून देता येईल यावर भर देणार असल्याचे अध्यक्ष शिंगे यांनी सांगितले. नूतन महिला आघाडी तालुका अध्यक्षा सौ. चित्रा शिंदे यांच्या हस्ते सौ. अर्चना चव्हाण यांना सन्मानित करण्यात आले सौ. वैजयंता पाटील यांच्या हस्ते दैनिक महासत्ता चे कोल्हापूर जिल्हाअध्यक्ष संदीप शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.
विष्णू पाटील यांचा स्वागतपर गीताने कार्यक्रम सुरु झाला, सौ. वैष्णवी शिंदे यांनी आभार मानले, अनिल कोकितकर यांनी सूत्रसंचालन केले.यावेळी आकाश चव्हाण, विनायक शिंदे, सागर पोवार यांच्यासह पंचक्रोशीतील मंडळी उपस्थित होती.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा