सोनेगाव,( राऊत) येथे लॉकडाऊन नंतर लालपरीचे खूप दिवसाने आगमन - दैनिक शिवस्वराज्य

सोनेगाव,( राऊत) येथे लॉकडाऊन नंतर लालपरीचे खूप दिवसाने आगमन


सुधीर बुरिले / वर्धा जिल्हा प्रतिनिधी                                वर्धा॑/ हिंगणघाट तालुक्यातील सोनेगाव राऊत हे छोटेशे गाव 600 लोकसंख्या असलेलं हे गाव या गावातून बाहेर जातो म्हटले तर जाण्यासाठी काहीही वाहने नव्हते सामान्य जनतेला पायदळ जावे लागत होते मात्र कार्य सम्राट आमदार समीर भाऊ कुणावार व पंचायत समिती सदस्य विजय भाऊ पर्बत यांच्या प्रयत्नमुळे सोनेगाव वासियांना हिंगणघाट आगार ने बस चालू केल्याने खुशीचे वातावरण पसरले आहे.
 जनतेने हिंगणघाट आगार व्यवस्थापकाचे आभार मानले कार्य सम्राट आमदार समीर भाऊ कुणावर यांचे सुद्धा आभार मानले लालपरीचे उदघाटन करतानी पंचायत समिती सदस्य विजयराव पर्बत या ग्रा. सदस्य, शितल विठ्ठल मुडे ग्रा. प. सदस्य, प्रभाकरराव सुपारे, संतोषराव लोणकर, सुधीर बुरीले, गोपाल नासरे, ईत्यादी हजर होते.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads