लसीकरणाकडे आरोग्य कर्मचार्‍यांनीच फिरवली पाठ - दैनिक शिवस्वराज्य

लसीकरणाकडे आरोग्य कर्मचार्‍यांनीच फिरवली पाठ


प्रतिनिधी / आकाश बारड :-
गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला जिल्ह्यात शनिवारी प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी ११०० कोरोना योद्ध्यांपैकी आरोग्य विभागातील ४७० जणांनी लस घेतली.
पहिल्या टप्प्यात केवळ आणि केवळ आरोग्य विभागातील अधिकारी, डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय आदी कर्मचाऱ्यांना  लस देण्यात येत आहे. याकरिता अशाच लोकांची पहिल्या दिवसासाठी यादी तयार केली होती. संबंधितांना त्याबाबत मोबाईलद्वारे संदेशही देण्यात आला होता. मात्र, त्यांनीच पाठ फिरवल्याचे चित्र जिल्ह्यात होते. कोरोना कालावधीत काम करूनही कोरोनाचा संसर्ग झाला नाही आणि आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे व लसीबाबत पसरलेल्या अफवा ही दोन प्रमुख कारणे यामागे असू शकतील, असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. या लसीसाठी नोंदणी करण्यात आली असली, तरी ती ऐच्छिक आहे. तसेच काहींना संदेश मिळाले नसावेत, अशीही शक्यता आहे. लसीकरणाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही, यामागील कारण काय ह्याचा शोध घेतला जाईल, संबंधितांकडे लेखी खुलासाही मागवला जाऊ शकतो, असेही सूत्रांनी सांगितले.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads