पन्हाळा येथील पेरीड गावात अजब प्रकार ; गावामध्ये शुन्य टक्के मतदान
पन्हाळा प्रतिनिधी / आशिष पाटील
कोल्हापूर येथील शाहूवाडी तालुक्यातील पेरीड हे गाव आहे, या गावात हा अजब प्रकार गजब घडला आहे, उमेदवारांनीही मतदान केल्या नसल्याचा प्रकार समोर आला आहे.
या गावात चक्क 65 वर्षानंतर निवडणूक लागली होती, तसेच ही निवडणूक आचर्यकारक पार पडली. या ठिकाणी गावातील एकही मतदाराने मतदान केले नाही, एवढेच नाही तर उमेदवारानेही स्वतः ला एकही मतदान केले नाही.
पेरीड गावामध्ये ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यात आली होती, मात्र, एका उमेदवाराने स्वतःचा उमेदवारी अर्ज भरला आणि गावात एका उमेदवारासाठी निवडणूक लागली होती, मात्र या गावात सायं. 5.30 वाजे पर्यंत एकाही व्यक्तीने मतदान केल्याचे समोर आले, त्यामुळे या गावची चर्चा जिल्ह्यात सर्वत्र सुरु होती.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा