शिक्षक गुणगौरव सोहळ्यात शंकर केमेकार यांचा सत्कार - दैनिक शिवस्वराज्य

शिक्षक गुणगौरव सोहळ्यात शंकर केमेकार यांचा सत्कार


केळापूर तालुका प्रतिनिधी / रामेश्वर पुदरवार :-
क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले जिवनदर्शन कार्यक्रमाचे निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद प्राथमिक विभाग यवतमाळच्या वतीने उपक्रमशिल शिक्षक म्हणून जि प उ प्राथमिक शाळा अहेरअलीचे मुख्याध्यापक श्री शंकर रामलूजी केमेकार यांचा जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी मा . प्रमोद सुर्ववंशी व शिक्षक आमदार ना गो गाणार यांच्या हस्ते गौरव करण्यात आला .
 लॉक डाऊनच्या काळातही विविध उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी संपर्कात राहून सतत ऑनलाईन शाळा 'क्षेत्रभेट व मत्सपालन केन्द्रास भेट मी शिक्षणाचा सह प्रवासी आदर्श अध्ययन समूह  ऑनलाईन स्पर्धा प्रश्नमंजूषा घरी जाऊन गृहपाठ अशा अनेक उपक्रमाच्या माध्यमातून सतत शाळा बंद असतांनाही शिक्षण चालू ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केला . या कार्यात  गावातील पालकांनी प्रचंड प्रतिसाद दिला .पालकांच्या व गावकऱ्यांच्या सहकार्यानेच हे होऊ शकले यात मात्र शंका नाही . माझ्या विदयार्थाची शैक्षणिक परवड होवू नये म्हणूनच हे कार्य हाती घेतले आहे . दि .४ जूलै २०२० पासून आजतागत सतत वर्ग घेऊन सर्व वर्गाचा अभ्यासक्रम पूर्ण करून त्यांची आकारिक चाचणी व संकलीत चाचणी पूर्ण करून घेतली व विदयार्थाना सतत प्रवाहात ठेवलं . 
जिवाची भिती अन् अभ्यासाची आवड याची सांगड घालत सुरक्षेच्या व आरोग्याच्या सर्व काळजी घेत हा शिक्षणाचा गाडा चालू ठेवला .विद्यार्थींना मास्क कसा बनवावा याचे पण मार्गदर्शन करण्यात आले . या कार्यात शाळा व्यवस्थापन समिती पालक समिती शिक्षकाच्या पाठीशी खंबीरपणे उभी होती आणि आहेत सुध्दा . सहकारी सर्व शिक्षकांचे कु पी .डब्लू कुतरेकर कु एस आर गडुमवार कु एस आर बोडणकर  यांचे मोलाचे सहकार्य या वेळेस लाभले . हे सर्व आम्ही करू शकलो कारण - आमचे ब्रिदच आहे.
राष्ट्रहित, शिक्षक हित, विद्यार्थी हित.
सदर कार्यक्रमात आमच्या शाळेचा सन्मान झाला या करिता आम्ही  महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग यवतमाळ यांचे सतत ऋणी राहू . सावित्रीबाई फुले जिवनदर्शन प्रश्नमंजूषा स्पर्धामध्ये आमच्या शाळेचे २० विदयार्थी ऑनलाईन सहभागी झाले होते हे मात्र विशेष .जि प उच्च प्राथ . शाळा अहेरअली तथा समस्त गाव कऱ्यांच्या वतीने विशेष आभार.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads