पदवीधर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदत वाढवून द्यावी ; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी - दैनिक शिवस्वराज्य

पदवीधर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदत वाढवून द्यावी ; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी


चाकूर प्रतिनिधी / मंगेश आडे :-
 पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी 20 जानेवारी 2021 च्या मुदतीपर्यंत ऑनलाईन जात पडताळणी चे प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम मुदत दिलेली होती पण या जात पडताळणी विभागामध्ये कर्मचाऱ्यांचा तुटवडा व प्रशासकीय कामांसाठी लागणारा विलंब हा लक्षात घेता ही दिलेली मुदत अगदी कमी असून या कामासाठी साधारणत : आणखीन एक महिन्याची मुदत द्यावी, अन्यथा हा हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. हीच गंभीर बाब म्हणून लक्षात घ्यावी अशी मागणी सम्यक विद्यार्थी आंदोलन या युवा शाखा चाकूर यांच्यावतीने चाकुर तालुक्याचे तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे यांच्याकडे मागणी केलेली आहे. यासाठी प्रमुख उपस्थिती वर्धमान कांबळे वंचित बहुजन आघाडी, सिद्धार्थ गायकवाड तालुका अध्यक्ष चाकूर, महेश बिराजदार शहर अध्यक्ष चाकूर, सागर जाधव तालुका महासचिव यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. 
या  शुभम टाळकुटे, रोहित गुडीले, प्रफुल नाईकवाडे, वैभव जहिरे, विजय भालेराव, केदार लोंढे, संदेश पाटोळे,अजय् घोटरे,सदानंद जाधव,भागेश् कसबे उपस्तित होते.


बातमी व जाहिरातीसाठी संपर्क :-
मंगेश आडे - ८०१०३२६८१९
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads