५८ वर्षीय इसमाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
संजय कारवटकर / यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी
यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील वडकी खैरी रोडवरील असलेल्या शेतलगत विहिरीत रविदास गुलाब खाडे वय वर्ष ५८ राहणार खैरी या इसमाने पहाटे ५.३० च्या दरम्यान विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. रविदास खाडे हा गेल्या २० ते २५ वर्षांपासून गावात दुध विक्री चा व्यवसाय करायचा,आज दि २१ जानेवारी रोजी पहाटे ५ वाजता नेहमीप्रमाणे तो वडकी येथे दूध घ्यायला आला होता.दूध घेऊन जाता वडकी खैरी रोडवर असलेल्या बापूरावजी फुटाणे यांच्या मालकीच्या शेतातील असलेल्या विहिरीत त्यांनी उडी मारून आपली जीवनयात्रा संपविली आहे.त्यांच्या मागे दोन मुल एक पत्नी असा आप्त परिवार आहे.
घटनास्थळी शेकडो नागरिकांची गर्दी जमली होती.या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही आहे.मृतदेह शवविच्छेदनासाठी राळेगाव येथे पाठविण्यात आले असून. पुढील तपास वडकी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनायक जाधव सह कर्मचारी गणेश मेसरे,किरण दासरवार करीत आहे.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा