कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्यास नॅशनल फेडरेशन ऑफ शुगरचा सर्वोच्च साखर उतारा पुरस्कार जाहीर - दैनिक शिवस्वराज्य

कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्यास नॅशनल फेडरेशन ऑफ शुगरचा सर्वोच्च साखर उतारा पुरस्कार जाहीर


पन्हाळा तालुका प्रतिनिधी / आशिष पाटील :-
कुडित्रे (ता करवीर ) येथील कुंभी कासारी सहाकारी साखर कारखान्यास नॅशनल फेडरेशन ऑफ को - ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लि. न्यू दिल्ली या संस्थेकडून हंगाम 2019-20 साठी राष्ट्रीय पातळीवरील सर्वोच्च साखर उतारा पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन, माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी दिली. डायरेक्टर ऑफ शुगर, भारत सरकार यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या उच्चस्तरीय तज्ञाच्या समितीने या पुरस्कारासाठी कुंभी कासारी कारखान्याची निवड केली आहे, पुरस्कार वितरण 20 मार्च 2021 रोजी बडोदा (गुजरात )येथे होणार आहे. चेअरमन नरके यांनी यापूर्वी कारखान्यास सन 1991-92 मध्ये  अखिल भारतीय पातळीवरील ऊस विकास कार्याबद्दल प्रथम क्रमांकाचे पारितोषिक आणि उच्च साखर उतारा विभागातील तृतीय क्रमांकाचा पुरस्कार तसेच 1017- 18 मध्ये नॅशनल फेडरेशन न्यू दिल्ली यांचा सर्वोच्च साखर उतारा पुरस्कार मिळाला असल्याचे सांगितले.
चेअरमन नरके यांनी कारखान्याने उच्च साखर उतारा, ऊस विकास आणि तांत्रिक कार्यक्षमता राखण्याचा प्रयन्त केला आहे, या कारखान्याच्या यशात सर्व ऊस उत्पादक सभासद, बिगर सभासद, संचालक मंडळ, कर्मचारी, ऊस तोडणी वाहतूक संघटना, व्यापारी व कंत्राटदार यांचा मोलाचा वाटा आहे असे त्यांनी सांगितले.
कारखान्यास नॅशनल फेडरेशन ऑफ को - ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज, वसंतदादा इन्स्टूट्युट, पुणे व महाराष्ट्र राज्य संघ सहाकारी कारखाना लि. मुंबई. यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले, यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन - निवास वातकर, संचालक -  जयसिंगराव पाटील (ठाणेकर,  बाजीराव शेलार, अनिल पाटील, विलास पाटील, किशोर पाटील, उत्तम वरूटे, दादा साहेब लाड, उपस्थित मान्यवर होते.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads