राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसलेंना ईडीने केली अटक
शिवाजी भोसले सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले यांना शनिवारी अंमलबजावणी संचालनालयाकडून (इडी) अटक करण्यात अ ईडीकडून अटक करण्यात आली आहे. बँकेमार्फत बेनामी कर्जवाटप केल्याच्या आरोपाखाली पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने यापूर्वीच अनिल भोसले यांना अटक केली आहे. अनिल भोसले हे राष्ट्रवादीचे विधानपरिषदेवरील आमदार आहेत. ED arrested NCP MLA Anil Bhosale in 300 crore Pune based bank scam
मनी लॉँड्रींगच्या केसमध्ये न्यायालयाकडून वॉरंट मिळाल्यावर भोसले यांना अटक करण्यात आली. बँकेमार्फत बेनामी कर्जवाटप केल्याच्या आरोपाखाली पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने आमदार अनिल भोसलेंसह चौघांनाअटक केली होती.

बँकेच्या रेकॉर्डमध्ये बनावट नोंदी खºया दाखवून हा घोटाळा केल्याचा आरोप आहे. एकूण 300 कोटींपर्यंत घोटाळ्याची व्याप्ती असल्याचा दावा केला जात आहे. उर्वरित 222 कोटींच्या घोटाळ्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. काही महिन्यांपूर्वी बँकेवर प्रशासक नेमण्यात आला होता. त्यानंतर बँकेच्या आर्थिक व्यवहारांवर निर्बंध घालण्यात आले होते.
उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत भोसले यांच्याबरोबरच तत्कालीन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्यावरही ठपका ठेवण्यात आला आहे. सुभाष देशमुख हे भोसले यांचे नातेवाईक असून त्यांनीच कारवाईला अडथळा केल्याचा आरोप याचिकेत केला आहे.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा