महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) च्या शेतकरी महिला उत्पादकांनी यवतमाळात सुरु केला ऑनलाईन भाजीपाला विक्री व्यवसाय . - दैनिक शिवस्वराज्य

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) च्या शेतकरी महिला उत्पादकांनी यवतमाळात सुरु केला ऑनलाईन भाजीपाला विक्री व्यवसाय .




संजय कारवटकर यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी, 7499602440

 यवतमाळ शहरामध्ये  मध्ये घाटंजी तालुक्यातील घाटंजी शेतकरी महिला उत्पादक कंपनी ली. घाटंजी यांनी यवतमाळ शहरातील गृहिणींसाठी घरपोच भाजीपाला पुरवठा सेवा सुरु केली आहे. महिला शेतकरी ते ग्राहकांपर्यंत भाजीपाला पोहोचवावा असा या व्यवसायाचा उद्देश असून, यवतमाळ शहरातील गृहिणींना स्वच्छ व ताजा भाजीपाला घरपोच मिळावा या साठी हा प्रयत्न आहे . 
विशेष म्हणजे महिलांच्या मार्फत चालविणारे सामूहिक व्यवसायात तंत्रद्यानाची जोड असलेला हा जिल्ह्यातील एकमेव असा नावीन्यपूर्ण व्यावसायीक प्रकल्प आहे. या साठी कंपनी ने Google Play Store App (Purensure- Online vegetable Store) व website(www.purensure.store) केली असून त्या माध्यमातून ग्राहकांना आपली मागणी नोंदविता येते. अँपवर भाज्यांचे दर आणि किंमत दिसते व गरजेप्रमाणे ऑर्डर करता येते. घाटंजी महिला प्रोड्युसर कंपनी ली. घाटंजी आणि प्युअर एन शुअर डॉट स्टोअर यवतमाळ यांच्या तांत्रिक मार्गदर्शनात सदर प्रकल्प पूर्णत्वास आला आहे . प्रायोगिक तत्वावर प्रकल्पाची सुरवात ५ फेब्रुवारी २०२१ पासून करण्यात आली असून मागील एक महिन्यामध्ये एकूण २२८ पेक्षा जास्त ग्राहक सदर सेवेशी जुळले असून दिवसागणिक ग्राहकांची संख्या वाढत आहे. ग्राहकांना गुणवत्तापूर्ण,स्वच्छ,ताजा,बाजार भावात आणि घरपोच भाजीपाला उपलब्ध होत असल्यामुळे ग्राहक या सेवे पासून आनंदी आहेत. सध्या स्टोरवर भाज्यांचे ३० प्रकार असून येत्या काही दिवसात आणखी प्रकार वाढविण्यात येणार आहेत. 

घाटंजी शेतकरी महीला प्रोड्युसर कंपनी ली.  महिला  शेतकरी उत्पादक गट असून या कंपनी मध्ये एकूण १८०३ महिला भागीदार आहेत तसेच एकूण कंपनी चे कामकाज हे महिलांन मार्फतच चालवण्यात येते . कंपनी मार्फत मुरली येथे भूमी उत्पादक गट हे भाजीपाला संकलन केंद्र चे नियोजन करते तसेच यवतमाळ येथे  भोसा रोड वर कंपनी चेभाजीपाला वितरण केंद्र आहे येथून ऑनलाईन आलेल्या ऑर्डर प्रमाणे ग्राहकांना घरपोच भाजीपाला नेऊन दिला जातो.  महिला दिनाचे औचित्य साधून कंपनी ८ मार्च २०२१ पासून व्यावसायिक स्टोअर सुद्धा सुरु करत आहे जेणेकरून ग्राहकांना शक्य असेल तर ते कंपनी च्या वितरण केंद्रामधून स्वतः भाजीपाला खरेदी करू शकतील . संकलन केंद्र व वितरण केंद्रामध्ये स्वच्छतेचे व कोविड 19 चे सर्व निर्देश पाळण्यात येत असून भाजीपाला योग्य व आकर्षक अश्या पॅकिंग मध्ये ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात येत आहे . सदर प्रकल्पासाठी  मा. जिल्हा अभियान संचालक तथा मु. का. अ. जिल्हा परिषद, मा.जिल्हा प्रकल्प संचालक, जी. ग्रा. वि.य., जी. प. यवतमाळ , जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष तसेच राज्य  अभियान कक्ष - उपजीविका चमू यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले असून, घाटंजी अभियान यावस्थापन कक्ष यांचे मार्गदर्शन व सहकार्यातून चालू आहे.
ग्राहकांनी ऑर्डर करण्यासाठी ग्राहक संपर्क 9689123863 वरून अँप ची लिंक मिळवू शकता अथवा www.purensure.store या संकेत स्थळावर जाऊन ऑर्डर करू शकता.


आमच्या डेली न्यूज अपडेट मोफत आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 9022324656 हा नंबर आपल्या Whatsapp ग्रुपला ऍड करा
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads