दलबदलू माजी खासदारांचा आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा
डी.वाय.पी. मॉलबाबत महापालिका दफ्तरी असलेल्या नोंदीप्रमाणे महापालिकेने जेवढ्या रकमेची मागणी केली आहे ती सर्व रक्कम भरली आहे. त्यामुळे घरफाळा बुडविण्याचा प्रश्नच येत नाही. महापालिका प्रशासनाची ती चूक आहे. यामध्ये पालकमंत्र्यांचा काही संबंध नाही, असे माजी महापौर निलोफर आजरेकर आणि माजी नगरसेवक शारंगधर देशमुख यांनी पत्रकार परिषदेत शनिवारी सांगितले.
माजी खासदार धनंजय महाडिक यांनी केलेल्या आरोपाला प्रत्युत्तर देताना ते म्हणाले, उलट पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर टीका करणारे महाडिक यांच्या आदर्श भीमा वस्त्रम इमारतीमध्ये चौथ्या मजल्यावर गोठा दाखवून आणि पार्किंगच्या जागेत गोडावून करून घरफाळा बुडविला आहे. डी.वाय.पी. मॉलबाबत महापालिका दफ्तरी असलेल्या नोंदीप्रमाणे महापालिकेने जेवढ्या रकमेची मागणी केली आहे ती सर्व रक्कम भरली आहे. त्यामुळे घरफाळा बुडविण्याचा प्रश्नच येत नाही. महापालिका प्रशासनाची ती चूक आहे. यामध्ये पालकमंत्र्यांचा काही संबंध नाही, असे माजी महापौर निलोफर आजरेकर आणि माजी नगरसेवक शारंगधर देशमुख यांनी पत्रकार परिषदेत शनिवारी सांगितले.
माजी खासदार धनंजय महाडिक यांनी केलेल्या आरोपाला प्रत्युत्तर देताना ते म्हणाले, उलट पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर टीका करणारे महाडिक यांच्या आदर्श भीमा वस्त्रम इमारतीमध्ये चौथ्या मजल्यावर गोठा दाखवून आणि पार्किंगच्या जागेत गोडावून करून घरफाळा बुडविला आहे.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा