महाराष्ट्र
राजकीय
डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या वतीने राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कारांची घोषणा
पाथरी तालुका प्रतिनिधी बालाजी गोरे 9665896009
डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या वतीने शैक्षणिक, सामाजिक, व्यावसायिक इत्यादी क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या स्त्री शक्तीचा जागतिक महिला दिनी हिरकणी राज्यस्तरीय पुरस्कार देवून सन्मान केला जाणार आहे. या वर्षीच्या राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कारांची घोषणा आज डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू पाटील भोयर, प्रदेशाध्यक्ष प्रदीप सोळंके, प्रदेशाध्यक्ष (प्रा.) लक्ष्मण नेव्हल यांनी संयुक्त रित्या जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. या वर्षीचे डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार – डॉ. भारती मंडवई ( नांदेड ), डॉ. शारदा रोशनखेडे ( नागपूर ), मीनाताई हिरालाल भोसले ( धुळे ), डॉ. अभिलाषा राकेश गावतूरे ( चंद्रपूर ), प्रफुल्लता बळीराम भिंगोले ( जालना ), मनीषा राकेश पाटील ( जळगाव ), प्रतीभाताई भराडे (सातारा), डॉ. सुचिता पाटेकर ( परभणी ), कल्पना हरिभाऊ कातोरे ( परभणी ), प्राचार्य मिनी थॉमस ( यवतमाळ ) यांना जाहीर झाले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सदरील पुरस्कारांचे वितरण पुरस्कार विजेत्यांच्या घरी जावून करण्यात येणार आहे.
आमच्या डेली न्यूज अपडेट मोफत आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 9022324656 हा नंबर आपल्या Whatsapp ग्रुपला ऍड करा
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा