महाराष्ट्र
परभणी जिल्ह्यात २० रुग्ण कोरोनाबाधित तर १५२ कोरोनामुक्त
तालुका प्रतिनिधी : - बालाजी गोरे परभणी शहरासह जिल्ह्यात रविवारी (दि.7) सायंकाळी सहा वाजेपर्यंत 20 व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्या आहेत. 152 कोरोनामुक्त व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून प्रेसनोटद्वारे देण्यात आली.
रुग्णालयातील कक्षात 289 कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यंत 331 कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात आजपर्यंत 8 हजार 860 कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्या आहेत. त्यापैकी 8 हजार 240 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. रुग्णालयातर्फे आतापर्यंत 1 लाख 34 हजार 525 व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले. त्यात 1 लाख 25 हजार 86 व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर 8 हजार 707 व्यक्तींचे नमुने पॉझिटिव्ह, 592 अनिर्णायक व 140 नमुने नाकारल्या गेले असल्याचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांनी प्रसिध्द केलेल्या प्रेसनोटद्वारे कळविले आहे.
आमच्या डेली न्यूज अपडेट मोफत आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 9022324656 हा नंबर आपल्या Whatsapp ग्रुपला ऍड करा
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा