एक एप्रिल पासून विजदारात दोन टक्क्यांनी कपात ; महावितरणचा निर्णय
इंधन दरवाढीमुळे जनता हैराण झालेली असताना वीज नियामक आयोगाने वीज ग्राहकांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. 1 एप्रिल 2021 पासून वीज दरात 2 टक्के कपात करण्याचे आदेश राज्य वीज नियामक आयोगाने राज्यात विजेचा पुरवठा करणाऱ्या पंपन्यांना दिले आहेत.
राज्य वीज नियामक आयोगाने इंधन समायोजन कर (एफएसी) फंडचा वापर करून ग्राहकांना त्याचा फायदा देण्याचे आदेश वीज पंपन्यांना दिले आहेत. या आदेशानुसार महावितरण, बेस्ट, टाटा, अदाणी या कंपन्यांच्या वीजदरात सरासरी 2 टक्क्यांची कपात केली जाईल. तर टाटा पॉवरच्या विजेच्या दरात मात्र वाढ होणार आहे. 1 एप्रिलपासून हे नवीन वीजदर लागू होणार आहेत.
आगामी पाच वर्षांसाठी राज्यातील वीज ग्राहकांचे वीजदर कसे असतील हेदेखील राज्य वीज नियामक आयोगाने जाहीर केले आहेत. यानुसार महावितरणच्या घरगुती वीजबिलात 1 टक्के कपात केली आहे. त्यामुळे प्रत्येक युनिटमागे 7.58 रुपये ग्राहकांना मोजावे लागतील. अदाणीच्या ग्राहकांसाठीही 0.3 टक्के इतकी वाढ लागू होणार असून प्रत्येक युनिटसाठी 6.53 रूपये मोजावे लागतील. बेस्टच्या ग्राहकांसाठी 0.1 टक्के दरवाढ करण्यात आला असून युनिटमागे 6.42 रुपये ग्राहकांना मोजावे लागतील.
टाटाच्या ग्राहकांवर दरवाढीचा बोजा
टाटा पॉवरच्या वीज दरांत 1 एप्रिलपासून 4.3 टक्के दरवाढ आयोगाने मंजुर केली आहे. यामुळे टाटा पॉवरच्या वीज ग्राहकांना आता युनिटमागे 5.22 रुपयांचा बोजा पडणार आहे.
कंपनी दरवाढ / कपात
महावितरण 1 (कपात)
अदाणी 0.3 (वाढ)
बेस्ट 0.1 (वाढ)
टाटा 4.3 (वाढ)

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा