पेट्रोल पंपावरील दुचाकी केली चोरट्यांनी केली लंपास - दैनिक शिवस्वराज्य

पेट्रोल पंपावरील दुचाकी केली चोरट्यांनी केली लंपास


प्रतिनिधी : - बालाजी गोरे                     पाथरी शहरातील सेलु कॉर्नर परिसरातील एका पेट्रोल पंपावर लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पाथरी नरसिंह कॉलनी येथील रहिवासी बालाजी बापुराव गायके यांनी आपली दुचाकी क्रमांक एम एच 22  एम 37 74  शुक्रवारी 11 ते 1 च्या दरम्यान सेलु कॉर्नर परिसरातील पेट्रोल पंपावर लावली होती या ठिकाणी त्यांनी पाहणी केली असता दुचाकी निर्दशनास आली नाही शोधाशोध केली मात्र दुचाकी आढळून आली नाही याप्रकरणी पाथरी पोलिस ठाण्यात बालाजी गायके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस कर्मचारी एन डी शितळे करत आहेत.


आमच्या डेली न्यूज अपडेट मोफत आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 9022324656 हा नंबर आपल्या Whatsapp ग्रुपला ऍड करा
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads