विधानसभा अध्यक्ष पदावरून महाविकास आघाडीमध्ये मतभेद ? - दैनिक शिवस्वराज्य

विधानसभा अध्यक्ष पदावरून महाविकास आघाडीमध्ये मतभेद ?


विधानसभा अध्यक्षपदावरून महाविकास आघाडीतील मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. उद्या सकाळी विधानभवनात याबाबत काँग्रेसची बैठक आहे. आज झालेल्या कॅबिनेट बैठकीत काँग्रेसने अध्यक्षपदाची निवडणूक याच अधिवेशनात घ्यावी ही भूमिका मांडली. पण शिवसेना आणि राष्ट्रवादी मात्र त्यासाठी अनुकूल नसल्याची माहिती समोर आली आहे.


नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देत काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी घेतली आहे.नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या विधानसभा अध्यक्षपदावर कोणाची नियुक्ती होणार, यावरून राज्याच्या राजकारणात मोठी उत्सुकता आहे.


सद्यस्थितीत अर्थसंकल्प चर्चा आणि तो मंजूर करून घेणे हे सरकारचे प्राधान्य आहे, त्यामुळे तूर्तास निवडणुकीसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी तयार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर दुसऱ्या बाजूला काहीही होऊ दे पण ही निवडणूक व्हावी म्हणून काँग्रेस आग्रही आहे.

दरम्यान,'महाराष्ट्रात विधानसभा अध्यक्षपद बिनविरोध होतं, निवडणूक होत नाही, पण हे सरकार असं आहे की विरोधी पक्षांशी संवाद करत नाही, विरोधी पक्षांच्या अधिकारांचं हनन करतं. विधानसभा अध्यक्षपदावरुन सरकार घाबरलेलं आहे, हे बघून मला आनंद होतोय' असा टोला काही दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.


दरम्यान,पटोले यांच्या राजीनाम्यानंतर आता विधानसभा अध्यक्ष पदी कोण विराजमान होणार याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मराठवाडय़ातील काँग्रेस नेते आमदार सुरेश वरपुडकर, आमदार संग्राम थोपटे, आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांच्या नावांची चर्चा सुरू आहे.


आमच्या डेली न्यूज अपडेट मोफत आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 9022324656 हा नंबर आपल्या Whatsapp ग्रुपला ऍड करा

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads