....तर तुमचे Whatsapp अकाऊंट होऊ शकते बंद - दैनिक शिवस्वराज्य

....तर तुमचे Whatsapp अकाऊंट होऊ शकते बंद


व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) युजर्सला व्हॉट्सअ‍ॅपकडून एक महत्त्वाचा मेसेज पाठवला जात आहे. या मेसेजला रिमाइंडरही म्हटलं जात आहे. जर तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप वापरत असाल, आणि या रिमाइंडरकडे तुमचं लक्ष गेलं नसेल, तर येणाऱ्या काही दिवसांत म्हणजेच 15 मेपासून WhatsApp वापरता येणार नसल्याची शक्यता आहे.

आपल्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीअंतर्गत WhatsApp ने आपल्या युजर्सला नोटिफिकेशन पाठवण्यास सुरुवात केली आहे. हे नोटिफिकेशन स्वीकारणं युजर्ससाठी अनिवार्य असेल. तरच भविष्यात युजर्स व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करू शकतील. WhatsApp वरून पाठवण्यात येणाऱ्या नोटिफिकेशनचे स्क्रिनशॉट अनेक युजर्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत.

WhatsApp कडून आलेल्या नोटिफिकेशननुसार, युजर्सच्या वैयक्तिक प्रायव्हसीमध्ये व्हॉट्सअ‍ॅप कोणतेही बदल करत नाही. तसंच युजर्सचे खासगी चॅटही एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्टेड असल्याने व्हॉट्सअ‍ॅप ते पाहू शकत नाही. नवीन अपडेट आल्यानंतरही यात कोणतेही बदल होणार नाहीत, असं सांगण्यात आलं आहे.

तसंच नव्या अपडेटमुळे व्यवसायिकांसाठी फेसबुक टूलचा वापर करून चॅट करणं सोपं होईल. बिजनेससह चॅट करणं पर्यायी असल्याचंही व्हॉट्सअ‍ॅपने सांगितलं आहे.

पॉलिसी न स्वीकारल्यास काय?

मिळालेल्या माहितीनुसार, WhatsApp ने 15 मेपर्यंत प्रायव्हसी पॉलिसी स्वीकारण्याची मुदत ठेवली आहे. व्हॉट्सअ‍ॅप युजर्समध्ये कोणत्याही प्रकारचा संभ्रम राहू नये, यासाठी पॉलिसीबाबत अनेक गोष्टींची माहिती देत आहे. परंतु युजर्सनी व्हॉट्सअ‍ॅपची नवी प्रायव्हसी पॉलिसी स्वीकारली नाही, तर सुरुवातीला काही दिवस युजर्स केवळ WhatsApp Call आणि नोटिफिकेशन पाहू शकतील. परंतु युजर्स कोणालाही मेसेज करू शकणार नाहीत, तसंच आलेले मेसेज वाचूही शकणार नाहीत.

दरम्यान, व्हॉट्सअ‍ॅपने सुरुवातीला 8 फेब्रुवारी रोजी हे बदल लागू करण्याची घोषणा केली होती. परंतु युजर्समधील गोंधळाचं वातावरण आणि मिळालेल्या प्रतिक्रियांनंतर ही पॉलिसी पुढे ढकलण्याचं ठरवलं होतं. आता युजर्सला 15 मेपर्यंत नवी प्रायव्हसी पॉलिसी अ‍ॅक्सेप्ट करावी लागणार आहे, अन्यथा अकाउंट बंद होऊ शकतं.


आमच्या डेली न्यूज अपडेट मोफत आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 9022324656 हा नंबर आपल्या Whatsapp ग्रुपला ऍड करा

Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads