चौथ्या सामन्यासह भारताने मालिका ३-१ ने जिंकली ; टीम इंडिया WTC च्या अंतिम फेरीत
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात आज (०६ मार्च) तिसऱ्याच दिवशी भारताने एक डाव आणि २५ धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका ३-१ अशा फरकाने जिंकली.
याबरोबरच भारताचे जूनमध्ये होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. अंतिम सामन्यात भारताचा सामना न्यूझीलंड विरुद्ध होईल. तसेच हा भारताचा मायदेशातील सलग १३ वा कसोटी मालिका विजय आहे.
चौथ्या सामन्यात भारताचा पहिला डाव ३६५ धावांवर संपुष्टात आल्याने भारताने १६० धावांची आघाडी घेतली होती. त्यानंतर दुसऱ्या डावात इंग्लंडला ५४.५ षटकात सर्वबाद १३५ धावाच करता आल्या.

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा