राजेश काटकर यांची परभणीत अप्पर जिल्हाधिकारीपदी नियुक्ती - दैनिक शिवस्वराज्य

राजेश काटकर यांची परभणीत अप्पर जिल्हाधिकारीपदी नियुक्ती


प्रतिनिधी : -  बालाजी गोरे
हिंगोली जिल्ह्याचे भुमिपूत्र असलेले राजेश काटकर यांची पदोन्नतीने परभणीत अप्पर जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झालेली आहे. दरम्यान, तब्बल एक वर्षानंतर  राजेश काटकर हे आज गुरुवार दिनांक 1 एप्रिल रोजी परभणीत  रुजू झाले आहेत.
 एक वर्षापूर्वी परभणीचे अप्पर जिल्हाधिकारी पद रिक्त झाल्यानंतर राजेश काटकर यांची नियुक्ती झाल्याचे आदेश जारी करण्यात आले होते. मात्र ते रुजू झाले  नव्हते. आज एक एप्रिल रोजी मध्यान्हानंतर काटकर रुजू झाले. त्यामुळे अनेक दिवसांपासून रिक्त असलेल्या पदावर वरिष्ठ अधिकारी रुजू झाले आहेत. यामुळे जिल्ह्यातील महसूल यंत्रणेला बळ मिळाले आहे. काटकर यांची प्रशासकीय कारकीर्द ही मुंबई आणि ठाणे परिसरातच राहिली आहे. त्यांचे बंधूदेखील उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत आहेत. परभणी जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब भेंडेकर यांनी काटकर यांचे स्वागत केले.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads