कोवीड लसीचा कोटा वाढवुन आरोग्य उपकेंद्रावर कोविड लसीकरण अभियान राबवावे -युवासेनेचे शंभुराजे फरतडे यांची मागणी - दैनिक शिवस्वराज्य

कोवीड लसीचा कोटा वाढवुन आरोग्य उपकेंद्रावर कोविड लसीकरण अभियान राबवावे -युवासेनेचे शंभुराजे फरतडे यांची मागणी


करमाळा प्रतिनिधी/अंगद भांडवलकर
        करमाळा तालुक्याची लोकसंख्या व वाढते कोविड रुग्ण पाहता करमाळा तालुक्या साठी दररोज तिन हजार कोविड लस उपलब्ध करून द्यावेत व प्रत्येक प्राथमिक आरोग्य उपकेंद्रावर लसीकरण मोहीम राबविण्यात यावी अशी मह्त्वपूर्ण मागणी युवा सेना तालुका समन्वयक शंभुराजे फरतडे यांनी निवेदना द्वारे केली आहे.

         सदर निवेदनाच्या प्रती जिल्हापरिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे , जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, तहसीलदार समिर माने, आरोग्य आधीकारी डाॅ सागर गायकवाड, गटविकास अधिकारी श्रीकांत खरात यांना देण्यात आल्या आहेत.
 

       या निवेदनात शंभुराजे फरतडे यांनी नमुद केले आहे की, सध्या कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर व रुग्णांचे होत असलेले मृत्यु, ऑक्सिजन बेड, रेमडिसिव्हर इन्जेक्शन चा तुठवडा या धास्ती मुळे  ४५ वर्षाच्या पुढील लोक कोविड लसीकरण करण्यास गर्दी करत आहेत, सध्या तालुक्यासाठी एक हजार लसीचे डोस उपलब्ध होत असुन ते फक्त करमाळा उपजिल्हा रुग्णालयात व साडे, वरकुटे, जेऊर, कोर्टी, उमरड या प्राथमिक आरोग्य केंद्रावरच लस उपलब्ध केली जात आहे. 

        उपजिल्हा रुग्णालय व प्राथमिक केंद्रावरच लस उपलब्ध होत असल्याने प्रचंड गर्दी होत आहे, तर अपुऱ्या लसीचे डोस उपलब्ध होत असल्याने अनेकांना तासभर रांगेत ऊभे  राहुल देखील लस मिळत नाही त्यामुळे लोकांचे हाल होत आहेत, तसेच गर्दी होत असल्याने कोरोनाच्या संसर्गाचा  धोका देखील वाढण्याची शक्यता असल्याने करमाळा तालुक्यासाठी कोविड लसी चे दोन हजार डोस वाढवुन मिळावेत व प्रत्येक प्राथमिक आरोग्य उपकेंद्रावर लसीकरण अभियान राबववावे अशी मागणी निवेदनात फरतडे यांनी केली आहे.

      सध्या तालुक्यात ३१ प्राथमिक आरोग्य उपकेंद्र उपलब्ध असुन  या उपकेंद्रावर लसीकरण अभियान राबवल्यास त्या ठिकाणी नेमणूक असलेले एक आरोग्य सेवीका, एक वैद्यकीय अधिकारी, तसेच आशा वर्कर ,पोलीस पाटील यांची देखील या अभियानासाठी मदत होणार असुन प्राथमिक आरोग्य केंद्रावर व उपजिल्हा रुग्णालयात जाण्या ऐवजी गावातील व गावाच्या तिन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्रावर लसीचा लाभ घेता येईल असेही फरतडे यांनी तहसीलदार, आरोग्य आधीकारी, यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.
या मागणीचा विचार करुन कारवाई झाल्यास लसीकरण मोहिमेस गती येवुन सोप्या पद्धतीने नागरीकांना लसीकरणचा लाभ घेता येईल असे फरतडे यांनी म्हटले आहे.

दैनिक शिवस्वराज्य वेब पोर्टल साठी जिल्हा तालुका तसेच गाव पातळीवर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे तरी इच्छुकांनी 9022324656 या नंबरवर संपर्क साधावा.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads