महाराष्ट्र
कोरोनामुक्त वडगाव करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे; सीए लहु काळे यांचे ग्रामस्थांना आवाहन
करमाळा प्रतिनिधी/अंगद भांडवलकर
सध्या कोरोना या रोगाने संपूर्ण देशात थैमान घातले असून ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे वडगाव येथील ग्रामस्थांनी घाबरून न जाता आपली कोरोना तपासणी करून गावं कोरोनामुक्त करण्यासाठी ग्रामपंचायत व प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन सीए लहु काळे यांनी केले आहे.
यावेळी अधिक बोलताना सीए काळे म्हणाले की, गावातील दोन व्यक्तींचा कोरोना रिपोर्ट पॉझीटीव्ह आल्यानंतर गावामध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमामधुन कोवीड टेस्ट घेण्यात आल्या. या घेतलेल्या ७४ टेस्टमध्ये १२ जणांचे व वडगाव गावामधील १० जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आलेले आहेत. म्हणजेच एकूण टेस्ट करण्यात आलेल्या नागरिकांपैकी १६.२१ ट्क्के लोक पॉझीटीव्ह येत आहेत.
गावातील नागरिकांनी घाबरून न जाता जबाबदारीने वागण्याची गरज आहे. तसेच लवकरच पुरेशा अँटीजेन टेस्ट किट उपलब्ध झाल्या की पुन्हा एकदा गावामध्ये मोफत कोरोना तपासणी शिबीर घेण्यात येणार आहे. नागरिकांनी भितीने तपासणी न करता स्वतः सह कुटुंब व गांवकऱ्यांच्या जीवाशी खेळु नये. जरी आपला कोरोना रिपोर्ट पॉझीटीव्ह आला तरी न घाबरता योग्य ती काळजी व उपचार घेऊन लवकर बरे होता येते. पण त्यासाठी आपली व आपल्या कुटुंबाची तपासणी करून घेणे गरजेचे आहे. जर घाबरुन तपासणीच केली नाही तर वेळीच निदान करता येत नाही. निदान करण्यास उशीर झाला तर खर्चही जास्त होतो आणि शारीरिक परिस्थिती सुद्धा हाताबाहेर जाऊ शकते. त्यामुळे शिबिरामध्ये प्रत्येकाने सहभागी होऊन स्वतःची व कुटुंबातील सर्वांची तपासणी करावी व कोरोनामुक्त वडगाव करण्यासाठी ग्रामपंचायतीला व प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच गावातील तरुणांनी माझे गाव माझी जबाबदारी असे समजून कोरोना तपासणी शिबीराविषयी जनजागृती करावी.
दैनिक शिवस्वराज्य वेब पोर्टल साठी जिल्हा तालुका तसेच गाव पातळीवर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे तरी इच्छुकांनी 9022324656 या नंबरवर संपर्क साधावा.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा