महाराष्ट्र
मुदगल शिवारात सापडला युवकाचा जळलेल्या अवस्थेत सांगाडा
प्रतिनिधी/बालाजी गोरे
मुदगल शिवारात मागील अनेक दिवसांपासून गुन्हेगारी बळावत असल्याचे चित्र दिसून येत असून तालुक्यातील मुदगल येथे घडणाऱ्या अशा घटनामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याचे दिसून येतंय यात मागील वीस दिवसांपूर्वी मुदगल येथे महिलेला गळा चिरून ठार केल्याची घटना घडली होती.तर त्यापूर्वी एका मुलीचा खून झाला होता.आज घडलेल्या घटनेबाबत अधिक माहीती अशी की,मुदगल येथील अनिल रेडे यांच्या शेतात अज्ञात युवकाचा जाळण्यात आलेला सांगाडा दिसल्याची रेडे यांनी पोलीसांना माहीती दिली असता पोलीसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवून घटनास्थळ गाठत तपास सुरू केला आहे.विशेष म्हणजे पोलिसांनी तपासाची सूत्रे अधिक गतीने हलवत विटा(बु.)येथील एका आरोपीस ताब्यात घेतले होते मात्र.पोलिसांनी खाकी दाखवताच आरोपीने दुसऱ्या दोन आरोपींना सोबत घेऊन चार हजार रुपये व एका मोबाईलसाठी सदरच्या युवकाला ठार मारले गुन्हा नष्ट करण्यासाठी त्या मयतास बोरीच्या झाडावर टाकून जाळले मात्र पुरेशे जळण नसल्याने हा युवक अर्धवट अवस्थेत जळाला असल्याचेही आरोपीने कबूल केले.यात पोलिसांनी इतर आरोपीबाबत विचारणा केली असता इतर दोन आरोपी हे पुणे येथे असल्याची माहीती आरोपी गोपाळ माणिक आरबाड यांने दिली.
अत्यंत निष्ठूरपणाचा कळस
दरम्यान पोलिसांनी आरोपीकडून माहीती घेतली असता एक मोबाईल आणि चार हजार रुपये घेतले होते.या पैशास आणि मोबाईल देण्यास प्रतिकार केला म्हणून रामपूरी येथील शैलेश नागोराव मुंगे याच्या डोक्यात लाकूड घालून अत्यंत निष्ठूरपणाचा कळस गाठत ठार केल्याचे आरोपीने कबूल केले आहे.यावेळी घटनास्थळी परिसरातील बघ्यांनी गर्दी केली होती.तर सदर घटनेची माहिती मिळताच
उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाल,सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सोमवंशी,पोलीस उपनिरीक्षक डॉ.मनोज अहिरे,पोलीस उपनिरीक्षक लोकलवार,पोलीस हवालदार अशोक सोडगीर,गोपाळ रासवे,पोलीस बिट अमलदार पिंपलपल्ले,पोलीस अंमलदार मुंजा जामगे,साठे,पोलीस पाटील रामकिशन घोडके,आदींनी घटनास्थळी भेट देऊन पुढील कार्यवाहीसाठी सुरुवात केली होती.दरम्यान परिसरात मोठ्या प्रमाणात सुरू असणाऱ्या अवैध वाळू उपशामुळे गुन्हेगारी बळावत असल्याची चर्चा होत आहे.
दैनिक शिवस्वराज्य वेब पोर्टल साठी जिल्हा तालुका तसेच गाव पातळीवर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे तरी इच्छुकांनी 9022324656 या नंबरवर संपर्क साधावा.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा