पावसाळ्या अगोदर विजेची कामे करून घ्या; युवा सेनेची महावितरणकडे मागणी - दैनिक शिवस्वराज्य

पावसाळ्या अगोदर विजेची कामे करून घ्या; युवा सेनेची महावितरणकडे मागणी



करमाळा प्रतिनिधी/अंगद भांडवलकर
        पावसाळा सुरू होण्यापूर्वी विज उपकरणांच्या दुरुस्तीची सर्व कामे तात्काळ करुन घ्यावीत. तसेच कुठे कुठे दुरुस्तीची गरज आहे त्या ठिकाणी पाहणी करून दुरुस्त केल्याचे वृत्त प्रसिद्धीस द्यावे अशी मागणी युवा सेना करमाळा तालुका समन्वयक तथा शिवप्रताप युवा प्रतिष्ठान चे संस्थापक शंभुराजे फरतडे यांनी महावितरण कडे लेखी निवेदना द्वारे केली आहे.
              महावितरण ला दिलेल्या निवेदनात फरतडे यांनी म्हटले आहे की, ग्रामीण भागात पावसाळा सुरू झाल्यांनतर मुसळधार पाऊस किंवा वादळ वारे नसताना देखील चार चार दिवस वीज गायब होते त्याचे प्रमुख कारण म्हणजे विजेच्या खांबावर असलेल्या चिमण्या खराब होवुन विजपुरवठा खंडित होतो.

पुर्व भागातील सिना कोळेगाव धरणावर सध्या अपुऱ्या दाबाने विज पुरवठा सुरु आहे तो आठ तास करावा या साठी वारंवार मागणी करत आहेत. पंरतु फक्त सहा तास वीजपुरवठा होत असून तोही अपुऱ्या दाबाने विजपुरवठा सुरु आहे. पुर्व भागातील निमगाव ते फिसरे ही खुप जुनी लाईन असुन या खांबावरील डिस्क जुने झाले आहेत. पावसाची रिमझिम झाली तरी विजपुवरठा खंडित होऊ शकतो. त्यामुळे तात्काळ डिस्क बदलुन घ्याव्यात व पावसाळ्या पुर्वी दुरुस्ती मोहीम राबवावी.
    -शंभुराजे फरतडे

    चॉकलेटी रंगाचे डिस्क ईन्सुलेटर (चिमण्या) तसेच डिपी स्ट्रक्चर वर असणाऱ्या पोस्ट ईन्सुलेटर ह्या चिनी मातीच्या असतात. वीजप्रवाह लोखंडी खांबामध्ये उतरु नयेत यासाठी या चिमण्या गरजेच्या असतात. परंतु उन्हाळ्यात अती उन्हामुळे तापतात व पावसाचे चार थेंब जरी पडले तरी फुटून जातात. त्यामुळे विजपुरवठा चार चार  दिवस खंडित होतो. तसेच ऐन पावसाळ्यात विज यंत्रणेसाठी देखील ही कामं धोकादायक ठरु शकतात. त्यामुळे पहिल्यांदा महावितरण ने खराब झालेल्या (चिमण्या) डिस्क, डिपी वरील पोस्ट ईन्सुलेटर, फ्युज बदलणे हि कामे पावसाळ्या अगोदर करावीत तसेच काही ठिकाणी विजेचे खांब कललेले आहेत, तारांना झोळ पडलेले आहेत, तसेच विजेच्या खांबाजवळ असलेली धोकादायक झाडे काढून टाकावीत. अशा विविध मागण्या युवा सेना तालुका समन्वयक शंभुराजे फरतडे यांनी केल्या आहेत.

दैनिक शिवस्वराज्य वेब पोर्टल साठी जिल्हा तालुका तसेच गाव पातळीवर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे तरी इच्छुकांनी 9022324656 या नंबरवर संपर्क साधावा.

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads