धरणगाव येथील क्रांतिवीर खाज्या नाईक स्मुर्ती संस्थेतर्फे Covid सेंटरला अकरा हजारांची मदत - दैनिक शिवस्वराज्य

धरणगाव येथील क्रांतिवीर खाज्या नाईक स्मुर्ती संस्थेतर्फे Covid सेंटरला अकरा हजारांची मदत


दैनिक शिवस्वराज्य -मंगेश पाटील 

 
धरणगाव_क्रांतिवीर  खाज्याजि नाईक स्मृति संस्था मार्फत कोरोना ची सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांसाठी धरणगाव एरंडोल रस्त्यावरील
हिरा इंटरनॅशनल स्कूल मध्ये मोफत कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आलेले आहे कोणाच्या भयावह परिस्थिती मध्ये तालुक्यातील कोरोना रुग्णांसाठी खाज्या नाईक संस्थेने चालवलेला हा उपक्रम स्तुत्य आहे या संस्थेच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळावं ,आपल्या कार्याला समाजाची देखील साथ आहे ही भावना  राहावी या उदेशाने तालुक्यातील शिक्षकांनी , शिक्षक संघटनांनी अकरा हजार रुपयाची मदत संस्थेचे सचिव विलास महाजन यांच्या कडे सुपूर्द केलेली आहे यावेळी माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष तथा इंदिरा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे सचिव सी के पाटील,तालुका मुख्याध्यापक संघ चे अध्यक्ष एस एस पाटील,तालुका टी डी एफ चे अध्यक्ष डी एस पाटील ,उपाध्यक्ष पी डी पाटील, व्ही टी पाटील आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते तर समाधान मोरे,युवराज पाटील,देवेंद्र पाटील,  मंदार चौधरी आदी खााज्या नाईक संस्थेचे कार्यकर्ते उपस्थित होते

फोटो_ क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मृति  संस्थेचे सचिव विलास महाजन यांच्याकडे कोरोना ग्रस्तांची उपचारासाठी आर्थिक साह्य भेट म्हणून देताना 
शिक्षक संघटनेचे पदाधिकारी सी के पाटील, एस एस पाटील, डी एस पाटील आदी


दैनिक शिवस्वराज्य वेब पोर्टल साठी जिल्हा तालुका तसेच गाव पातळीवर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे तरी इच्छुकांनी 9022324656 या नंबरवर संपर्क साधावा.

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads