जाणून घ्या पश्चिम बंगालसह इतर राज्यांचा Exit पोल
पश्चिम बंगालसह पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल 2 मे रोजी जाहीर होणार आहेत. मात्र, गुरुवारी या राज्यांचे एक्झिट पोल जाहीर झाले आहेत. पश्चिम बंगालमध्ये या निवडणुकीत विशेष चुरस होती. भाजप आणि तृणमूल काँग्रेसने प्रतिष्ठा पणाला लावली होती. पश्चिम बंगालमध्ये कोणाचे सरकार स्थापन होणार याबाबत सगळ्यांचा उत्सुकता आहे. 2 मे रोजी निकाल जाहीर होतीलच. मात्र, तोपर्यंत एक्झिट पोलची चर्चा होणार आहे.
सर्वात जास्त चर्चा असणाऱ्या पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस सत्ता राखणार असल्याचा अंदाज सी वोटरच्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. या अंदाजानुसार 292 पैकी तृणमूल काँग्रेसला 152-164 जागा मिळतील . भाजपला 109-121 तर काँग्रेसला 14-25 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर आसाममध्ये एडीएला 58-71, युपीएला 53-66 तर इतरांना पाच जागा मिळण्याचा अंदाज सीवोटरने वर्तवला आहे.
तामिळनाडूमध्ये एआयडीएमकेला 58-70, डीएमकेला 160-172 तर इतरांना 7 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर पद्दुचेरीमध्ये एनडीएला 19-23, युपीएला 6-10, तर इतरांना 2 जागा मिळण्याचा अंदाज आहे. केरळमध्ये एलडीएफला 71-77, युडीएफला 62-68 तर भाजपला दोन जागा मिळण्याचा अंदाज सीवोटरने वर्तवला आहे.
इंडिया टुडेच्या एक्झिट पोलच्या अंदाजनुसार आसाममध्ये भाजपला 75- 85 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर काँग्रेसला 40- 50 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर इतरांना 2-4 जागा मिळण्याची शक्यता आहे. केरळमध्ये एलडीएफला 104-120, यूजीएफला 20-36 भाजपला 1-2 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर तामिळनाडूमध्ये एआयएडीएमकेला 38-54 तर डीएमकेला 175-195 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दैनिक शिवस्वराज्य वेब पोर्टल साठी जिल्हा तालुका तसेच गाव पातळीवर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे तरी इच्छुकांनी 9022324656 या नंबरवर संपर्क साधावा.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा