कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या नेत्यांचे पुतळे जाळण्यापेक्षा सत्यता तपासावी; करमाळा तालुक्यावर अन्याय होणार नाही म्हणणाऱ्यांनी ते सिद्ध करुन दाखवावे- ॲड.अजित विघ्ने - दैनिक शिवस्वराज्य

कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या नेत्यांचे पुतळे जाळण्यापेक्षा सत्यता तपासावी; करमाळा तालुक्यावर अन्याय होणार नाही म्हणणाऱ्यांनी ते सिद्ध करुन दाखवावे- ॲड.अजित विघ्ने



करमाळा प्रतिनिधी/अंगद भांडवलकर
            सध्या करमाळा, इंदापुर तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात चर्चित असलेल्या उजनी पाणीवाटपाचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट व गंभीर होत चाललेला आहे. इंदापूर विरुध्द सोलापूर असा वाद पेटण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. दररोज आंदोलन, मोर्च्यांच्या, निवेदनाच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत असताना, करमाळा येथील राजकीय विचारवंत व विश्लेषक ॲड. अजित विघ्ने साहेब यांनी प्राप्त परिस्थितीचा विचार करून यावर आपले मत व याचा विचार न केल्यास या पुढील दिशा काय असेल याचा इशाराही त्यांनी आपल्या प्रतिक्रियेत दिला आहे.
           याविषयी पुढे बोलताना ते म्हणाले की, जिल्ह्याचे पालकमंत्री दत्ता मामा भरणे यांनी इंदापुर तालुक्यातील ज्या गावांकरीता सांडपाणी उचलण्याची योजना मंजुर केली आहे, ती गावे उजनी धरणक्षेत्राच्या लाभक्षेत्रात येत नाहीत. संबधित गावांसाठी स्वतंत्र योजना असुन, त्या ठिकाणी उर्ध्व (वरच्या) भागातुन पाणी किंवा सांडपाणी आणावे. परंतु उजनी धरणातील पाणी साठलेल्या पाण्यातुन घेऊ नये. भरणे मामा सुज्ञ राजकारणी आहेत, त्यामुळे त्यांनी सर्व धरणग्रस्तां बरोबर समोरासमोर बसुन चर्चा करणे क्रमप्राप्त आहे. सध्या कोरोनाचे वातावरण आहे, जिल्ह्यात १४४ कलम लागु आहे, त्यामुळे आंदोलन करणे योग्य होणार नाही. मात्र उजनी धरणकाठचा शेतकरी संदर्भित आदेशामुळे भयभीत असुन आंदोलनाच्या तयारीत आहे.
           पालकमंत्री यांनी धरणग्रस्त कमिटी, तज्ञ शेतकरी व धरणग्रस्तांची बैठक घेऊन समोरासमोर चर्चा करावी. सांडपाण्याच्या नावाखाली पाणी उचलुन आम्हा धरणग्रस्तावर अन्याय करण्याचा प्रयत्न करू नये. धरण वजा असताना भिगवण, भांबोरा, सिध्दटेक भागात पाण्याचा थेंब नसतो. त्यावेळी पात्र पुर्ण कोरडे झालेले असताना सांडपाणी कोठे जाते?
      वस्तुतः उजनी चे पाणी वाटप धोरण पुर्वीच ठरलेले असुन दि.२२/०४/२०२१ चा आदेश फसवा असुन सांडपाणी आणि पाणी वेगवेगळे करायला तिथे कोणता राजहंस बसवणार आहात? हा आदेश पूर्णपणे चुकीचा असुन यासंदर्भात  उजनी धरणकाठचे आम्ही शेतकरी आदरणीय शरद पवार साहेब, मंत्री अजितदादा पवार, आमदार रोहीत पवार यांना भेटुन वस्तुस्थिती मांडणार आहोत. तसेच चुकीचा झालेला निर्णय, आदेश रद्द करणेस भाग पाडणार आहोत. आम्ही सर्वपक्षीय नेतेमंडळीशी चर्चा करीत असुन, अभ्यासपूर्ण माहीती घेऊन आदेश रद्द न झाल्यास पुढील दिशा ठरवुन, जनहीत याचिका दाखल करणार आहोत. तातडीने जनहीत याचिका दाखल करणेबाबत अनेकांच्या सुचना, मदत मिळत असुन, सदर झालेला आदेश चुकीचा असलेने त्याचा राजकीय पटलावर देखील वेगळे परिणाम भविष्यात दिसतील याचे भान ठेवुन नक्कीच नेतेमंडळी योग्य निर्णय घेतील.
शेवटी बोलताना ते म्हणतात की, इंदापुर तालुक्यातील व करमाळा तालुक्यातील कार्यकर्त्यांनी एकमेकांचे नेत्यांचे पुतळे जाळणे ऐवजी सत्य काय आहे ते तपासुन निर्णय घ्यावेत. चुकीचा निर्णय झालाय हे आमचे ठोस म्हणणे आहे आणि ज्यांना निर्णय चुकीचा नाही असे वाटते त्यांनी ते सिद्ध करून दाखवावे.


दैनिक शिवस्वराज्य वेब पोर्टल साठी जिल्हा तालुका तसेच गाव पातळीवर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे तरी इच्छुकांनी 9022324656 या नंबरवर संपर्क साधावा.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads