महाराष्ट्र
मांगी येथील प्रसिद्ध व्यापारी कांतीलाल संचेती यांचे अल्पशा आजाराने निधन
करमाळा प्रतिनिधी:अंगद भांडवलकर
करमाळा तालुक्यातील मांगी गावचे करमाळा येथील प्रसिद्ध व्यापारी कांतीलाल हिराचंद संचेती वय ६४ यांचे पुणे येथे उपचार चालू असताना अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. संचेती यांच्या अशा अचानक जाण्याने मांगी गावावरती शोककळा पसरली आहे. राजकीय व सामाजिक क्षेत्रातही कांतिभाई यांचे खूप मोठे योगदान होते. मा.सामाजिक न्याय राज्यमंत्री कै. दिगंबर बागल यांचे ते विश्वासू कार्यकर्ते होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत व कष्टातून त्यांनी त्यांचा व्यवसाय उभा केला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मूले, सुना व नातवंडे असा परीवार आहे.
दैनिक शिवस्वराज्य वेब पोर्टल साठी जिल्हा तालुका तसेच गाव पातळीवर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे तरी इच्छुकांनी 9022324656 या नंबरवर संपर्क साधावा.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा